बेस्ट प्रशासनाने जाहीर केलेल्या विशेष वाहतूक योजनेनुसार, यात्रेच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे 321-मेरी, ए-202, ए-375, ए-422, ए-473, सी-71 आणि सी-505 या मार्गांवर विशेष बसेस तैनात करण्यात येणार आहेत. या बसेस नियमित सेवा देणार असून सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध राहतील. या बससेवा वांद्रे स्टेशन (पश्चिम) ते हिल रोड पार्कदरम्यान धावतील.
advertisement
मुंबईकरांनो लक्ष द्या! प्रभादेवी पूल बंद केल्याचा थेट फटका प्रवाशांना; एसटीच्या तिकीट दरात वाढ
सुरक्षा व गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतीही बस थेट माउंट मेरी चर्चपर्यंत जाणार नाही. हिल रोड पार्क येथे सर्व बससेवा संपतील आणि त्या ठिकाणाहून भाविकांना पायी चर्चकडे जावे लागेल. अरुंद गल्ल्या व संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी बेस्टने प्रमुख ठिकाणी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी तैनात केले आहेत. हे अधिकारी मार्गदर्शन करतील, रांगा नीट राखतील आणि आपत्कालीन स्थितीत मदत पुरवतील.
बेस्ट प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा आणि खासगी वाहनांचा वापर शक्यतो टाळावा. गर्दी व वाहतुकीचा योग्य समन्वय राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.