याआधी दादर–पुणे, नाशिक–छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर ई-एसी बस सुरू झाल्यानंतर बोरिवली–नाशिक या मार्गावरील बसची मागणी वाढत होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून आता दोन्ही दिशांना मिळून एकूण 22 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पुढील काही दिवसांत आणखी नवीन बसगाड्या दाखल झाल्यानंतर काही फेऱ्या वाढवण्याचीही तयारी आहे अशी माहिती एसटीच्या वाहतूक विभागाने दिली.
advertisement
महिलांना मिळणार नवा फायदा?
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना बोरिवली–नाशिक एसी बसचा प्रवास फक्त 266 रुपयांत करता येईल. पुरुष प्रवाशांसाठी तिकीट दर 509 रुपये आहे. बोरिवलीहून नाशिककडे जाणारी पहिली बस पहाटे 5 वाजता सुटेल आणि शेवटची बस सायंकाळी 5 वाजता असेल. नाशिककडून बोरिवलीकडे जाणारी पहिली बस सकाळी 6 वाजता असून शेवटची बस सायंकाळी साडेपाचला निघेल. ही सेवा ऑनलाइन आरक्षणासाठीही उपलब्ध आहे.
दररोजच्या फेऱ्या (बोरिवली ते नाशिक):
पहाटे 5.00 त्यानंतर सकाळी 7.00, 8.00, 9.00, 10.00, 11.00, दुपारी 12.30, 1.30, 2.30, 3.30 आणि संध्याकाळी 5.००.
दररोजच्या फेऱ्या (नाशिक ते बोरिवली):
सकाळी 6.00, 7.00, 8.00, 9.00, 10.00, दुपारी 12.30, 1.30, 2.30, 3.30, 4.30 आणि संध्याकाळी 5.30.
नवी ई-एसी बस सेवा सुरू झाल्याने मुंबई आणि नाशिकदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभ, आरामदायी आणि वेळ वाचवणारा प्रवास अनुभवता येणार आहे.
