या बोगद्याच्या बांधकामात ड्रिल-अँड-ब्लास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही टोकांपासून सुरू झालेल्या खोदकामाने डोंगरातील खडकांना सोडून या बोगद्याच्या उभारणीला सुरुवात केली. एकूण 18 महिने लागलेल्या या प्रक्रियेमध्ये खडकांची स्थिती ओळखून रिअल-टाइम निरीक्षण करण्यात आले आणि बोगद्याच्या मजबूततेसाठी शॉटक्रीट, रॉक बोल्ट आणि जाळीदार गर्डर्स सारखी सपोर्ट सिस्टिम बसवण्यात आली. सध्या बोगद्याचे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि अन्य अंतर्गत व बाह्य कामे सुरू आहेत.
advertisement
Sunday Megablock : रविवारी लोकलचा प्रवास नकोच; तब्बल 145 रेल्वे रद्द, कुठून कुठे गाड्या धावणार?
महाराष्ट्रात 7 बोगदे
या बोगद्यासह मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग घेतला आहे. संपूर्ण 508 किमीच्या कॉरिडॉरमध्ये 27.4 किमी बोगद्यांचा समावेश आहे ज्यात 21 किलोमीटर भूमिगत आणि 6.4 किलोमीटर पृष्ठभागावरील बोगदे आहेत. आठ डोंगरी बोगद्यांपैकी सात बोगदे महाराष्ट्रात असणार आहेत. तर एक 350 मीटर लांबीचा बोगदा गुजरातमध्ये आहे.
2 तास वाचणार
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या प्रवासाचा वेळ 1 तास 58 मिनिटांपर्यंत कमी होईल. यामुळे दोन्ही शहरांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. याचा फायदा दोन्ही शहरांतील जलद वाहतूक आणि विकासासाठी होणार आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत बुलेट ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जन 95 टक्क्यांनी कमी होईल. ज्यामुळे पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पडेल.
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीसाठीही मोठे योगदान दिले जात आहे आणि संपूर्ण प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर भारतातील परिवहन प्रणाली मोठा टप्पा गाठणार आहे.






