Mira Road News: उमेदवारी अर्ज भरायला गेल्या अन् घरात झाला 'गेम', अखेर पोलिसांची एंट्री
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार श्रद्धा शेलार यांच्या घरात चोरी केलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी उलगडा केला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 13 (इंद्रलोक मीरा रोड) मधून निवडणूक लढवणाऱ्या श्रद्धा अनिल शेलार यांच्या घरी झाली होती. महानगर पालिका निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या शेलार कुटुंबीयांच्या घरामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि हजारोंची रोख रक्कम लंपास केली आहे. नेमकं अर्ज भरण्याच्याच दिवशी चोरट्यांनी घरामध्ये घुसून चोरी केल्यामुळे शेलार कुटुंबियांची डोकेदुखी वाढली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार श्रद्धा शेलार यांच्या घरात चोरी केलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी उलगडा केला आहे.
काशीगाव पोलिसांनी तीन चोरांना अटक केली आहे. दरम्यान, काशीगाव पोलिसांनी चोरांसोबतच चोरांनी चोरलेल्या गोष्टीही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांमध्ये, इरफान युसूफ खान, सागर दिलीप सोनी आणि अजय विजय टोर्णे यांचा समावेश आहे. या तिघांनीही मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार श्रद्धा शेलार यांच्या घरातून 43 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असा मुद्देमाल चोरला आहे. चोरांबद्दलची माहिती आणि घरामधून चोरीला गेलेल्या सामानाबद्दलची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांनी दिली आहे.
advertisement
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांनी सांगितले की, श्रद्धा शेलार ह्या पूनम सर्जन बिल्डिंगमध्ये राहतात. 30 डिसेंबर रोजी त्या घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंबासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी घरी परतल्यानंतर त्यांच्या दरवाजाची कडी तुटलेली होती आणि कपाटातून ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख गायब होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी भाईंदर रेल्वे स्टेशनवर आरोपींना अटक केली. पीआय पाटील सांगितले की, आरोपी दुसऱ्या राज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. तिघांवरही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडून सखोल चौकशी केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 4:28 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mira Road News: उमेदवारी अर्ज भरायला गेल्या अन् घरात झाला 'गेम', अखेर पोलिसांची एंट्री











