शायनिंग मारायची नाही, पॅनेल निवडून आणायचा, नाना काटेंसमोर उभं राहणं टाळलं, शहराध्यक्षाला चव्हाणांची तंबी

Last Updated:

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असलेल्या नाना काटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी टाळले.

रविंद्र चव्हाण-नाना काटे-शत्रुघ्न काटे
रविंद्र चव्हाण-नाना काटे-शत्रुघ्न काटे
पिंपरी चिंचवड : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीविरुद्धच भारतीय जनता पक्षाची मुख्य लढाई असल्याने पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक खऱ्या अर्थाने तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाल्याने प्रचाराला देखील भलताच रंग चढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी प्रचाराचा शुभारंभ केला. पॅनेलच्या बाहेर जाऊन अजिबात प्रचार करायचा नाही. शायनिंग मारायची नाही, पॅनेमधले उमेदवार निवडून आणायचे, अशी तंबी चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना दिली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असलेल्या नाना काटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी टाळले. नाना काटे हे पिंपळे सौदागरच्या प्रभाग क्रमांक २८ मधून निवडणूक लढवित आहेत. मात्र त्यांच्यासमोर थेटपणे निवडणूक लढवणे शत्रुघ्न काटे यांनी मुद्दाम टाळल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांनी शत्रुघ्न काटे यांना एकप्रकारे इशारा दिला.
advertisement

रविंद्र चव्हाण यांनी विकासकामांचा पाढा वाचला

पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपने गेल्या पाच वर्षात काय प्रकारचा विकास करून दाखवला आहे, हे जनतेसमोर सांगा. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेकडो कोटींचा निधी शहराला मिळाला आहे. शहराच्या प्रत्येक प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. काही लोक आता आमच्याविरोधात प्रचार करतायेत. पण आपले कामे जनतेच्या मनावर ठसवा, अशा सूचना रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या.
advertisement

अजिबात शायनिंग मारायची नाही. सेटिंगही करायची नाही, रविंद्र चव्हाण यांची तंबी

त्याचवेळी पॅनेलच्या बाहेर जाऊन कुणीही स्वतंत्रपणे प्रचार करण्याचा प्रयत्न करू नये. अजिबात शायनिंग मारायची नाही. सेटिंगही करायची नाही. पॅनेलच्या उमेदवारच निवडून आणायचे, अशी तंबी रविंद्र चव्हाण यांनी दिली. त्यांचा रोख शत्रुघ्न काटे यांच्याकडे होता, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे.
advertisement

हिंदू आहे, हे सांगायला अंगात रग लागते

हिंदुत्त्वाची विचारसरणी आणि विकासकामे या रस्त्याने भाजप प्रवास करीत आहे. हिंदू आहे, हे सांगायला देखील अंगात रग लागते. ती रग आमच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण हिंदुत्त्वाची विचारधारा सोबत घेऊन आम्ही चाललो आहोत, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शायनिंग मारायची नाही, पॅनेल निवडून आणायचा, नाना काटेंसमोर उभं राहणं टाळलं, शहराध्यक्षाला चव्हाणांची तंबी
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement