पाकिस्तानात दूध उकळणं नको! वैतागलेल्या महिलेचा VIDEO VIRAL

Last Updated:

एका पाकिस्तानी महिलेने पाकिस्तानात दूध उकळण्याच्या त्रासाबाबत सांगितलं आहे. तिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. 

News18
News18
आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात दररोजचं दूध असतं. कुणी नुसतं दूध पितं, कुणी दुधाचा चहा पितं, कुणी कॉफी तर कुणी दुधाचा आणखी कशासाठी तरी वापर करतं. वापर कसाही असो की दूध आणलं की आधी आपण ते गरम करतो किंवा उकळतो. पण पाकिस्तानात राहणाऱ्या एका महिलेला पाकिस्तानात दूध उकळणं नको वाटतं. ती अक्षरश: वैतागली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
दूध उकळण्यात काय इतकं रॉकेट सायन्स आहे, पाकिस्तानात असं कोणत्या पद्धतीने दूध उकळलं जातं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. माया खान असं या महिलेचं नाव आहे. ही पाकिस्तानी महिला ज्यात ती दुधाचं पॅकेट उघडून ते उकळताना दिसते.
advertisement
व्हिडिओमध्ये तिने तक्रार केली आहे की, "पाकिस्तानात मला फक्त एकच गोष्ट आवडत नाही, दूध उकळणं. रात्री 1 वाजता घरी येऊन दूध उकळणं खूप कठीण आहे. दूध उकळणं, त्यावर मलाई काढणं, ते थंड करणं आणि बाटलीत ठेवणं हे थकवणारं आहे." माया गमतीने म्हणाली, "काश माझ्याकडे अल्डी किंवा वॉलमार्टसारखं गॅलन दुधाचं मशीन असतं."
advertisement
व्हिडीओवरून महिला कच्च्या दुधाबाबत सांगत असल्याचं समजतं.  माहितीनुसार पाकिस्तानमध्ये 95% दूध कच्चं सेवन केलं जातं. भारतातही होतं. पण ते पिण्यापूर्वी ते उकळणे ही सामान्य पद्धत आहे. उकळल्याने ई. कोलाय आणि साल्मोनेलासारखे धोकादायक बॅक्टेरिया मारले जातात, ज्यामुळे दूध पिण्यायोग्य बनतं.












View this post on Instagram























A post shared by Maya Khan (@mmkhan2020)



advertisement
मायाच्या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. "तक्रार करण्याऐवजी बाजारात जाऊन तिथंही पाश्चराइज्ड दूध उपलब्ध आहे", "ही पाकिस्तानची समस्या नाही, ती तुमची समस्या आहे." अशी कमेंट युझर्सनी तिच्या व्हिडीओवर केली आहे.
advertisement
अनेकांनी मायाला बाजारातून पाश्चराइज्ड दूध खरेदी करण्याचा सल्ला दिला, जे आता भारत आणि पाकिस्तान दोन्ही ठिकाणी सहज उपलब्ध आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
पाकिस्तानात दूध उकळणं नको! वैतागलेल्या महिलेचा VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement