गुरुवारी मुंबईतील आरए स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली. आरए स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते, जिथे अभिनयाचे वर्ग घेतले जातात. मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. बातमी मिळाल्यानंतर त्यांचे पालकही आले आहेत. मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. या वेळी परिसरात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्व मुलं ही १५ वर्षाखालील आहे.
advertisement
आरोपीची काय आहे मागणी?
रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव आहे. माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे. मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेक वेळा भेटून झाले. . मी एकटा नाही, अनेक लोकांना हा प्रश्न आहे, त्याचं सोल्युशन साठी मला संवाद साधायचा आहे, असं रोहित आर्यने म्हटलं आहे.
आरोपीने हे पाऊल का उचलले?
आरोपीचे काही पैसे सरकारी प्रोजेक्टमध्ये लावले होते. त्याने कोट्यवधीची गुंतवणूक केली होती, मात्र त्याचे नुकसान झाले. नुकसानासाठी त्याने सरकारला जबाबदार ठरवले होते. यामुळे त्यानी आपली बाजू सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
