दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ
मुंबई आणि मुंबई उपनगरातील नागरिक, व्यावसायिक, कंपनी मालक आता त्यांच्या मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र यासह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी त्यांच्या क्षेत्रासंबंधित कार्यालयापुरती मर्यादित न राहता मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयात करू शकतील. या सहा कार्यालयांमध्ये बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये धावपळ करण्याची गरज नाही आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.
advertisement
या सहा कार्यालयांमध्ये बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये धावपळ करण्याची गरज नाही आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल.
या निर्णयामुळे व्यवसायिक आणि कंपनी मालकांसह घरकुलधारकांचेही कामकाज सुलभ होईल. पूर्वी नागरिकांना केवळ त्यांच्या स्थानिक मुद्रांक कार्यालयात जावे लागत असे जे अनेकदा वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत असे. आता ही अट रद्द झाल्यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक लवचिक आणि सोपी झाली आहे.