फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक
या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 1406 वरून 1410 इतकी वाढणार आहे. सध्या गर्दीच्या वेळेत लोकल प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नवीन फेऱ्यांमुळे प्रवास अधिक सुकर होण्याची अपेक्षा आहे.
कांदिवली-बोरिवली सहावी मार्गिका प्रवाशांसाठी खुली
पश्चिम रेल्वे प्रशासनाने कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहावी रेल्वे मार्गिका विकसित केली होती. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने आता अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवणे शक्य झाले आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. सहावी मार्गिका सुरू झाल्यामुळे बोरिवली ते वांद्रे टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकल सेवेसाठी उपलब्ध मार्गिकांवरील ताण कमी झाला आहे.
advertisement
इतक्या लोकल फेऱ्या वाढल्या अन् वेळाही ठरल्या
पश्चिम रेल्वेवर चार अतिरिक्त नवीन लोकल सुरु करणार असून या नवीन लोकल फेऱ्या अप आणि डाऊन दिशेने धिम्या मार्गावर प्रत्येकी दोन असणार आहेत. अप मार्गावर सकाळी 11.39 वाजता भाईंदर येथून वांद्रेला जाणारी लोकल सुटेल. त्यानंतर दुपारी 12.14 वाजता भाईंदर ते चर्चगेट अशी दुसरी लोकल धावेल. डाऊन मार्गावर वांद्रे येथून पहाटे 4.30 वाजता आणि दुपारी 1.२१ वाजता भाईंदरकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्या असतील.
