ही विशेष व्यवस्था शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रविवार 7 डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. नागरिकांनी गर्दीच्या मार्गांचा वापर टाळावा आणि शक्य असेल तिथे पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी वाहतूक पोलिसांचे सुमारे 450 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कोणते रस्ते बंद राहणार आणि कुठे वन-वे लागू?
advertisement
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा रुग्णालयापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. मात्र हिंदुजा रुग्णालय परिसरातील रहिवाशांना एस. बैंक जंक्शनकडून डावीकडे वळून पांडुरंग नाईक रोड मार्गे राजा बढे चौकापर्यंत जाता येईल तसेच एस.के. बोले रोडच्या उत्तरेकडील लेनवरून सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पुर्तगाली चर्च जंक्शनपर्यंत वन-वे वाहतूक लागू राहणार आहे.
या विशेष वाहतूक नियोजनाचा उद्देश चैत्यभूमी परिसरात होणाऱ्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवणे, अनुयायांना आणि स्थानिकांना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. अशा प्रकारे वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि सर्वांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येईल.
