मका दराची घसरगुंडी कायम
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 45 हजार, 624 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 8 हजार, 481 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1310 ते जास्तीत जास्त 1924 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 534 क्विंटल मक्यास सर्वसाधारण 3250 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे! वातावरण पुन्हा बदललं, हवामान खात्याचं अपडेट
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 62 हजार, 761 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 67 हजार, 485 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 334 ते 1488 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 350 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1300 ते 2500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
नागपूर बाजारात विक्रमी भाव
राज्याच्या मार्केटमध्ये 55 हजार, 370 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. लातूर मार्केटमध्ये 13 हजार, 961 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3876 ते 4621 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. सध्या महाराष्ट्रात सोयाबीनचा सरासरी भाव 4100 ते 4400 रुपये आहे. मात्र आज नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल सोयाबीनला प्रतीनुसार 8000 ते 8200 रुपये विक्रमी बाजारभाव मिळाला.





