अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हितेश केदारी, राजेश प्रसाद, राजन कक्कड, रवी ऊर्फ रफीक खान, निमेश मेवाणी (खोटा घरमालक) आणि दीपक शहा यांचा समावेश आहे. तर अमित ठाकूर हा मुख्य सूत्रधार सध्या पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार नवल राजपूत हे घर खरेदीच्या शोधात होते. डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी ‘हाउसिंग डॉट कॉम’ या संकेतस्थळावर मालाड परिसरातील घरांची माहिती पाहिली. याच दरम्यान अमित ठाकूर याने त्यांच्याशी संपर्क साधून मालाड पश्चिम येथील शुभश्री अकॉर्ड इमारतीतील सदनिका विक्रीस असल्याचे सांगितले. आरोपींनी नवल यांना संबंधित घर प्रत्यक्ष दाखवले तसेच बनावट कागदपत्रे सादर करून घराचा सौदा 1.10 कोटी रुपयांना निश्चित केला.
advertisement
मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी; ‘या’ दिवशी पुरवठा बंद राहणार, कारण काय?
या व्यवहाराअंतर्गत नवल यांनी 26 लाख रुपये चेकद्वारे ‘एएसपी इन्फ्रा’ या नावाने दिले तर 4 लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. विशेष म्हणजे व्यवहाराच्या वेळी नवल यांनी संपूर्ण प्रक्रिया मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केली होती. मात्र घर नोंदणीसाठी संपर्क साधल्यानंतर अमित ठाकूर आणि त्याचे सहकारी टाळाटाळ करू लागले. वारंवार संपर्क करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नवल यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
यानंतर नवल राजपूत यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण आणि निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रथम हितेश केदारी आणि राजेश प्रसाद यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात राजन कक्कड, रवी ऊर्फ रफीक खान, निमेश मेवाणी आणि दीपक शहा यांनाही मुंबई व ठाणे परिसरातून अटक करण्यात आली.
सध्या फरार आरोपी अमित ठाकूरचा शोध सुरू असून या टोळीने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.






