मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग म्हणून नावाने लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद
घाटकोपरमध्ये 14 निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या होर्डिंगबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग अशी नोंद लिम्का बुक रेकॉर्डमध्ये झालेली आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग्ज अनधिकृत होते असा आरोप केला जात आहे. पालिकेने संबंधित होर्डिंग उभारणीवर आक्षेप घेतला होता. पालिका केवळ 40 फूट × 40 फूट होर्डिंग उभारणीला परवानगी देते. अशात अपघातग्रस्त झालेल्या होर्डिंग 120 फूट × 120 फुटांचे होते. संबंधित होर्डिंग इगो मिडिया कंपनीचे असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वेच्या जागेवर हे होर्डिंग होते. मुंबई रेल्वेच्या पोलीस आयुक्तांकडून एसीपीद्वारे चार होर्डिंगसाठी परवानगी देण्यात आली होती. पण होर्डिंग बनवण्याआधी संबंधित कंपनीकडून रेल्वे विभागाकडून अधिकृतपणे कोणतीही परवानगी किंवा एनओसी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती आता समोर येत आहे.
advertisement
वाचा - 4 फूट पुढे असल्याने गेला जीव! घाटकोपर अपघातातील टॅक्सीचालकाच्या मृत्यूची Inside Story
फडणवीस यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून 44 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पोलीस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून आहेत. होर्डिंग हटवण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
