TRENDING:

Mumbai-Goa Highway ची नवी डेडलाईन, 13 तासांचा प्रवास 6 तासांवर; रस्त्याला इतका वेळ का? खरं कारण आलं समोर!

Last Updated:

मुंबई आणि कोकणाला जोडणाऱ्या बहुचर्चित मुंबई– गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (NH-66) रुंदीकरणाचे काम गेले अनेक वर्षे रखडलेलेच आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई आणि कोकणाला जोडणाऱ्या बहुचर्चित मुंबई– गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (NH-66) रुंदीकरणाचे काम गेले अनेक वर्षे रखडलेलेच आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या चार उड्डाण पुलांच्या (फ्लायओव्हर्स) आणि दोन बायपास रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे ह्या प्रकल्पाचे काम रखडताना दिसत आहे.
Mumbai-Goa Highway ची नवी डेडलाईन, 13 तासांचा प्रवास 6 तासांवर; रस्त्याला इतका वेळ का? खरं कारण आलं समोर!
Mumbai-Goa Highway ची नवी डेडलाईन, 13 तासांचा प्रवास 6 तासांवर; रस्त्याला इतका वेळ का? खरं कारण आलं समोर!
advertisement

महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवास सुलभ होईल आणि मुंबई- गोवा अंतर सहा तासांत पार करता येईल, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा अद्याप जैसे थे च पाहायला मिळत आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला 2013 सालापासून सुरूवात झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणारा पनवेल- कासू- इंदापूर हा सुमारे 84 किलोमीटरचा मार्ग जवळपास पूर्ण झाला आहे. या भागात वाहनचालकांना तुलनेने सुरळीत आणि आरामदायी प्रवास करता येत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या मते इंदापूरच्या पुढेच मुंबई- गोवा वाहतुकीच्या खऱ्या अडचणी सुरू होतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

advertisement

इंदापूर (Indapur) ते झरप (Zarap) हा सुमारे 470 किलोमीटर लांबीचा मार्ग केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या अखत्यारीत येत आहे. या मार्गावर इंदापूर बायपास (सुमारे 3 किमी) आणि माणगाव बायपास (सुमारे 7 किमी) सर्वात मोठे अडथळा आहे. हे दोन्हीही बायपास मूळ करारात समाविष्ट होते. परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे मंत्रालयाला सुमारे सहा महिन्यांपूर्वी नव्याने निविदा काढाव्या लागल्या. सध्या या बायपासचे काम सुरू झाले असले; तरी ते मार्च 2027 पूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

advertisement

त्यामुळे मुंबई आणि गोवा दरम्यानचा सध्याचा प्रवास वेळ सहा तासांऐवजी आठ ते नऊ तासांमध्ये पूर्ण होईल असा दावा करण्यात आला आहे. परिणामी, इंदापूर आणि माणगाव परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना, विशेषतः गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असल्याने प्रवाशांची गैरसोय अधिकाधिक वाढतच आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वाहनचालकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी इंदापूर आणि माणगावमधील सध्याचे रस्ते रुंद करण्यात आले आहेत. स्थानिक वाहनांची आणि बाहेरून येणार्‍या वाहनांची वाहतूक कोंडी होते. शहरांच्या हद्दीतच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतो, अशी तक्रार वाहनचालकांकडून होतेय."

advertisement

माणगावच्या पुढे परिस्थिती तुलनेने बरीच सुधारलीये. त्या भागात रस्त्याचे रूंदीकरण वेगवान पद्धतीने झालेय. परशुराम घाट ते झरप हा टप्पा जवळपास पूर्णत्वास आला आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, निवळी, पाली आणि संगमेश्वर या चार ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाण पुलांचे काम गेल्या जवळपास दोन वर्षांपासून मुंबई- गोवा वाहतुकीवर परिणाम करत आहे. प्रत्येकी 800 मीटर लांबीचे हे उड्डाणपूल अद्याप अपूर्णच आहेत. MoRTH च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व उड्डाणपूल मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यानंतर वाहनांना पुलावरून वाहतूक करण्याची परवानगी दिली जाईल.

advertisement

पुढे अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, संपूर्ण महामार्गाची अवस्था एकसारखी खराब नाही. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या भागांपुरतीच वाहतूक कोंडी प्रामुख्याने मर्यादित आहे. उड्डाणपुलांच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सेवा रस्ते (सर्व्हिस रोड्स) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. “चार उड्डाणपूल आणि दोन बायपास वगळता, सध्या देखील पनवेल ते गोवा हा प्रवास आठ ते नऊ तासांत करता येतो.”, अशी माहिती MoRTH चे मुंबई विभागीय अधिकारी आणि या प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत फेगडे यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वय 6 वर्ष, पुण्यातील मिहिराने रचला इतिहास, बनली भारतातील सर्वात तरुण वेटलिफ्टर
सर्व पहा

दरम्यान, चैतन्य पाटील नावाच्या एका अभियंत्याने 470 किलोमीटर लांबीच्या मुंबई–गोवा महामार्गावर तब्बल 29 दिवसांची पायी पदयात्रा केली. या प्रवासादरम्यान त्यांनी रस्त्यावरील त्रुटी, धोकादायक ठिकाणं आणि संभाव्य उपाययोजनांचे सविस्तर दस्तऐवजीकरण केले. मुंबई- गोवा महामार्गाचा सविस्तर अहवाल चैतन्य यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला. ज्यामुळे या प्रकल्पातील विलंब आणि अडचणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Goa Highway ची नवी डेडलाईन, 13 तासांचा प्रवास 6 तासांवर; रस्त्याला इतका वेळ का? खरं कारण आलं समोर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल