सीएसएमटी ते अंधेरीचा प्रवास संपला; हार्बर लोकल गोरेगावपर्यंत
सध्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल, अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. पूर्वी सीएसएमटी-अंधेरीदरम्यानच हार्बर सेवा होती. त्यामुळे अनेक प्रवासी सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढचा प्रवास करायचा. प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हार्बर सेवेला गोरेगावपर्यंत वाढवले. हा विस्तार डिसेंबर 2017 पासून सुरू होण्याचे नियोजन होते पण तांत्रिक अडचणींमुळे मार्च 2019 पासूनच गोरेगावपर्यंत लोकल सुरू होऊ शकल्या.
advertisement
आता गोरेगावपर्यंतची सेवा यशस्वी ठरल्याने बोरिवलीपर्यंत विस्तारण्याचे ठरले आहे. हा प्रकल्प एमयूटीपी-3 ए अंतर्गत राबविण्यात येईल, आणि त्यासाठी अंदाजे 825 कोटींचा खर्च येणार आहे. विस्तार दोन टप्प्यांत होणार आहे - गोरेगाव ते मालाड 2 किमीचा पहिला टप्पा 2026-27 मध्येआणि मालाड ते बोरिवली 5 किमीचा दुसरा टप्पा 2027-28 मध्ये पूर्ण होईल.
थेट सेवेमुळे प्रमुख स्थानकांवरील गर्दी आटोक्यात
हा विस्तार झाल्यानंतर पनवेल ते बोरिवली थेट लोकलने प्रवास करता येईल. यामुळे कुर्ला, दादर, वडाळा रोड स्थानकांवरील प्रवाशांचा ताण कमी होईल. तसेच प्रवाशांना थेट लोकल मिळाल्याने वेळेची बचत होईल आणि प्रवास अधिक सोयीस्कर बनेल.
