वातानुकूलित रेल्वेत तपासणी मोहीम
विनातिकीट प्रवाशांना आवर घालण्यासाठी मध्य रेल्वे सातत्याने मोहीम राबवत असते. यापूर्वी वातानुकूलित लोकलमध्ये अशाच प्रकारची तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. हेल्पलाइन तिकीट तपासणी उपक्रमात मोठ्या प्रवाणावर विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर प्रथम श्रेणी डब्यात देखील ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
Mumbai Local: लोकलच्या गर्दीत घुसण्याची गरज नाही, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल डबा!
advertisement
लोकलच्या प्रथम श्रेणीतून विनातिकीट प्रवास
लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. यामुळे मुंबई विभागाचे विशेत तिकीट तपासणी पथक रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱअयांसह विशेष मोहीम हाती घेणार आहे. अनधिकृत प्रवाशी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रवासातच दंड आकारण्यात येणार आहे. दंड भरण्यास नकार दिल्यास अशा प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून स्थानिक तिकीट तपासणीसांकडे सोपवले जाईल.