Mumbai Local: लोकलच्या गर्दीत घुसण्याची गरज नाही, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल डबा!

Last Updated:

Mumbai Local: मुंबईत लोकल गाड्यांमध्ये दररोज 50 हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा असणार आहे.

Mumbai Local: लोकलच्या गर्दीत घुसण्याची गरज नाही, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल डबा!
Mumbai Local: लोकलच्या गर्दीत घुसण्याची गरज नाही, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल डबा!
मुंबई : रेल्वेची लोकल सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. परंतु, प्रचंड गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणे अडचणीचे आणि काही वेळा जीवघेणे देखील ठरते. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता केवळ सीटच उपलब्ध होणार नसून विशेष डबा असणार आहे. गाडीतील एका लगेज डब्याचे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विशेष डब्यात रुपांतर करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाकडून 5.4 कोटी रुपयांच्या खर्चातून ही व्यवस्था करण्यात येत आहे.
मुंबईत लोकल गाड्यांमध्ये दररोज 50 हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. ज्येष्ठ नागरिकांना समर्पित डब्यांची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या लगेच डब्यातून प्रवासाची परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयाने रेल्वेला दिले होते. यावर रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र डब्याचीच व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
advertisement
कामासाठी निविदा
सध्या पश्चिम रेल्वेच्या लोकलध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 14 जागा राखीव आहेत. चर्चगेट टोकापासून तिसऱ्या आणि 12 व्या कोचमध्ये या जागा राखीव आहेत. परंतु, गर्दीच्या काळात तिथंपर्यंत पोहोचणं कठीण होतं. त्यामुळे रेल्वेने सामानाच्या डब्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित डबा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन पॉईंट असणार आहेत. एका वर्षात टप्प्याटप्याने ही सुविधा सर्व 105 गाड्यांत सुरू केली जाणार असून याच्या निवदाही जारी करण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: लोकलच्या गर्दीत घुसण्याची गरज नाही, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल डबा!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement