ब्लॉकदरम्यान लोकल वेळापत्रकातील बदल
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
ठिकाण: माटुंगा - मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग
वेळ: सकाळी 11.05 ते दुपारी 3.45
परिणाम: सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळवली जातील. यामुळे या लोकल माटुंगा मुलुंड दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवले जातील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळवली जातील, त्यामुळे अप मार्गावर काही वेळेस विलंब होईल.
advertisement
Dombivli News: डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकातील खोळंब्याला पूर्णविराम, उड्डाण पुलाला रेल्वेची मंजुरी
हार्बर मार्ग
ठिकाण: कुर्ला - वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्ग
वेळ: सकाळी 11.10 ते दुपारी 4.10
परिणाम: सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर किंवा पनवेल कडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटी कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील. या कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या मार्गांवर विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
ठिकाण: सांताक्रूझ - गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्ग
वेळ: सकाळी 10 ते दुपारी 3
परिणाम: सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर लोकल धावतील, मात्र विलेपार्ले स्थानकावर थांबा होणार नाही कारण फलाटाची लांबी अपुरी आहे. राम मंदिर स्थानकावर जलद मार्ग नसल्यामुळे येथेही लोकल थांबणार नाही. मात्र, हार्बर मार्गावर विलेपार्ले आणि राम मंदिरासाठी लोकल चालवण्यात येतील.






