Indian Railways Rules : प्रवाशांनो लक्ष द्या ! फक्त 48 तासांत तिकीट बुकिंग नियम बदलणार; नेमका कोणता होणार फायदा?

Last Updated:

Train Ticket Booking Rules Change : 11 नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वेमध्ये तिकीट बुकिंग नियम बदलत आहेत. नेमके कोणते बदल करण्यात येणार आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

News18
News18
ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण भारतीय रेल्वेने भारतीय रेल्वेने 11 नोव्हेंबर 2025 पासून ट्रेन तिकीट बुकिंगची वेळ आणि नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या नियमांचा उद्देश तिकीट बुकिंगची प्रक्रिया प्रवाशांसाठी अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवणे हा आहे.
advertisement
 ट्रेन तिकिटाच्या नियमात होणार हे बदल
ट्रेन तिकिटांच्या केलेल्या बदलांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकीटांची बुकिंग अगोदर ६० दिवसांपर्यंत करता येईल तसेच आरक्षित तिकीट बुकल्यानंतर पहिले 15 मिनिटांत आधार पडताळणी करणे अनिवार्य आहे. रेल्वेने केवळ तिकीट बुकिंगच्या वेळेतच नव्हे, तर स्लीपर आणि एसी कोचच्या बुकिंगच्या वेळेतही बदल केला आहे. याशिवाय, तिकीट रद्द करण्याचे नियम, सामान घेण्याची मर्यादा आणि वेटिंग लिस्टशी संबंधित अटींमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
advertisement
मुख्य बदल पुढीलप्रमाणे आहेत
1)आता तिकीट फक्त प्रवासाच्या तारखेपासून 60 दिवसांपूर्वी बुक करता येईल. यापूर्वी ही मुदत 120 दिवस होती.
2)ऑनलाइन आरक्षणाच्या पहिल्या 15 मिनिटांत तिकीट बुक करण्यासाठी आधार लिंक खाते आणि आधार तपासणी करणे अनिवार्य आहे.
3)तिकीट बुकिंग सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहील.
advertisement
4)तत्काळ तिकीट बुकिंगस्लीपर क्लाससाठी सकाळी 11 वाजता आणि एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
5)आरक्षित कोचमध्ये सोपे आणि बसण्याचे वेगळे वेळापत्रक लागू केले आहे; रात्री 10 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रवाशांनी आपली बर्थ वापरणे अनिवार्य आहे.
advertisement
6)वरिष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिला यांना लोअर बर्थची प्राधान्य देण्यात येईल.
महत्त्वपूर्ण बदल आणि त्यांचे फायदे
आगाऊ बुकिंग कालावधी कमी केल्याने प्रवाशांना लवकर टिकीट मिळतील आणि ब्लॉक होण्याची समस्या कमी होईल. आरक्षित तिकीटांसाठी आधार तपासणी अनिवार्य असून फक्त आधार लिंक असलेल्या खात्यांना प्राधान्य मिळेल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Indian Railways Rules : प्रवाशांनो लक्ष द्या ! फक्त 48 तासांत तिकीट बुकिंग नियम बदलणार; नेमका कोणता होणार फायदा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement