पुणेकर फायद्याची बातमी! 15 नोव्हेंबरपासून खास योजना सुरू होणार, पैसे वाचणार

Last Updated:

Pune News: पुणेकरांच्या फायद्याची बातमी असून महापालिकेने अभय योजना जाहीर केले आहे. या योजनेतून महापालिकेला 150 कोटी मिळणार आहेत.

पुणेकर फायद्याची बातमी! 15 नोव्हेंबरपासून खास योजना सुरू होणार, पैसे वाचणार
पुणेकर फायद्याची बातमी! 15 नोव्हेंबरपासून खास योजना सुरू होणार, पैसे वाचणार
पुणे: पुणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. प्रलंबित असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. ही योजना 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 31 जानेवारी 2026 पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेत नागरिकांना थकबाकीवरील 75 टक्के दंडाची माफी देण्यात येणार आहे.
महापालिकेची मिळकतदारांकडे जवळपास 12 हजार कोटींची थकबाकी आहे. यामध्ये 3 हजार 158 कोटी मूळ मिळकतकरांची थकबाकी आहे, त्यावर दंडाची रक्कम एकूण 9 हजार कोटी रुपये आहे. अनेक वर्षांपासून हा कर थकबाकी असल्याने महानगरपालिका दर महिन्याला यावर 2 टक्के व्याज आकारते. यामुळे प्रलंबित थकबाकी जमा होऊन पालिकेच्या तिजोरीत निधी जमा होणार आहे.
advertisement
महानगरपालिकेच्या मते, या योजनेचा उद्देश म्हणजे कर थकबाकीदारांना प्रोत्साहन देऊन शहराच्या महसुलात वाढ करणे आणि प्रलंबित कराची वसुली सुलभ करणे हा आहे. अनेक करदाते आर्थिक अडचणींमुळे मागील काही वर्षांपासून कर भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर मूळ करासोबतच मोठ्या प्रमाणात दंडही जमा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने नागरिकांना ‘अभय’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
या योजनेनुसार, जे नागरिक आपला मूळ कर भरतील, त्यांना थकबाकीवरील दंडातून 75 टक्क्यांची सूट मिळणार आहे. उर्वरित 25 टक्के दंड भरावा लागेल. या माध्यमातून PMC ला सुमारे 150 कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज आहे.
मिळकतदारांना सरसकट होणार फायदा
अभय योजनेचा फायदा घरगुती आणि व्यावसायिक अशा सर्व मिळकतदारांना होणार आहे. दंडाच्या रकमेत 75 टक्के सवलत मिळणार आहे. दंडाची रक्कम जास्त असेल तरीही त्यावर सवलत मिळणार आहे. नागरिकांसाठी ही योजना म्हणजे आर्थिक दिलासा ठरणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना दंडाच्या ओझ्यातून मुक्तता मिळेल, तर महापालिकेलाही महसूल वाढवण्याची संधी मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर फायद्याची बातमी! 15 नोव्हेंबरपासून खास योजना सुरू होणार, पैसे वाचणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement