पार्थ पवार दोन्ही बाजुंनी अडकले, व्यवहार रद्द केला तरीही निबंधक कार्यलयाने दिला दणका

Last Updated:

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बहुचर्चित आणि वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार दोन्ही बाजुंनी अडचणीत सापडले आहेत. व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेऊनही त्यांची सुटका झाली नाही.

अजित पवार-पार्थ पवार
अजित पवार-पार्थ पवार
पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बहुचर्चित आणि वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पार्थ पवार यांच्या कंपनीने संबंधित व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी पार्थ पवार यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाल्याचं समोर आलं आहे. कारण पार्थ पवार दोन्ही बाजुने अडचणीत सापडले आहेत.
पार्थ पवार यांनी ३०० कोटी रुपयांचा हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या 'अमेडिया' कंपनील तब्बल २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे, अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे.
खरं तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हा व्यवहार रद्द करत असल्याची सार्वजनिक घोषणा केली होती. त्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे व्यवहार रद्द करण्यासंबंधी अर्ज केला होता. मात्र, या अर्जाला उत्तर देताना सहदुय्यम निबंधक कार्यालयाने ही मोठी अट समोर ठेवली आहे, ज्यामुळे पार्थ पवार यांची कोंडी झाली आहे.
advertisement

काय आहे २१ कोटींच्या शुल्कामागचे कारण?

निबंधक कार्यालयाने अमेडिया कंपनीला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, कंपनीने यापूर्वी जमीन खरेदी करताना या जागेवर 'आयटी पार्क' विकसित करणार असल्याचे सांगितले होते. आयटी पार्कच्या नावाखाली अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्कात नियमानुसार असलेली सवलत मिळवली होती.
मात्र, आता कंपनीने हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, ज्या कारणास्तव ही सवलत देण्यात आली होती, ते कारण (म्हणजे आयटी पार्क उभारणी) आपोआपच निरस्त झाले आहे. त्यामुळे पूर्वी मिळालेली सवलत आता लागू होणार नाही, असे निबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
advertisement

व्यवहार रद्द म्हणजे नव्याने हस्तांतरण

निबंधक कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, जमीन व्यवहार रद्द करणे म्हणजे अमेडिया कंपनीने ही जमीन पुन्हा मूळ मालक शीतल तेजवानी यांच्याकडे सोपवणे आहे. हा कायदेशीररित्या एक नवीन हस्तांतरण व्यवहार मानला जातो. यासाठी नियमानुसार शुल्क भरणे बंधनकारक आहे.

७ टक्के दराने भरावे लागणार शुल्क

हा संपूर्ण व्यवहार ३०० कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे महसूल नियमांनुसार यावर एकूण ७ टक्के शुल्क आकारले जाईल. यामध्ये ५ टक्के मुद्रांक शुल्क, १ टक्का स्थानिक संस्था कर आणि १ टक्का मेट्रो कर यांचा समावेश आहे. हे सर्व मिळून अमेडिया कंपनीला २१ कोटी रुपये भरावे लागतील, त्यानंतरच हा वादग्रस्त जमीन व्यवहार कायदेशीररित्या रद्द होऊ शकेल. सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या या भूमिकेमुळे, अजित पवार यांनी घोषणा करूनही, पार्थ पवार यांच्या कंपनीला २१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय या वादग्रस्त व्यवहारातून सुटका मिळवता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे राजकीय आणि कायदेशीर पातळीवर पवार कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्थ पवार दोन्ही बाजुंनी अडकले, व्यवहार रद्द केला तरीही निबंधक कार्यलयाने दिला दणका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement