Chhatrapati Sambhajinagar : हुंदके देत रडला, निरागस असल्याचा आव आणला, 4 लाख चोरणारा नोकर कुठं फसला?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar News : मालकाचे चार लाख रुपये चोरून पोलिसांकडेच खोटी तक्रार दाखल करणारा नोकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सीसीटीव्हीमधून उघडकीस आलं नोकराचं नाटक आता त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

‎मालकाचे ४ लाख पळवणारा नोकरच निघाला खोटा फिर्यादी<br>
‎मालकाचे ४ लाख पळवणारा नोकरच निघाला खोटा फिर्यादी<br>
‎छत्रपती संभाजीनगर : आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी काही जण चुकीचा मार्ग स्वीकारतात आणि क्षणातच गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकतात. अशीच धक्कादायक घटना जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. मालकाचे चार लाख रुपये लुटल्याचा बनाव रचणारा नोकरच प्रत्यक्षात चोर निघाल्याचा खुलासा अवघ्या १२ तासांत पोलिसांनी केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
‎फरदीन रफिक शेख 25, रा. दादा कॉलनी, कैलासनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आनंद अग्रवाल यांच्या दुकानात काम करतो. ५ नोव्हेंबर रोजी मालकाला भिशीतून मिळालेली चार लाखांची रक्कम आणण्यासाठी अग्रवाल यांनी फरदीनला शहागंज येथील एका दुकानात पाठवले होते. पैसे घेऊन परतताना जालना रोडवरील तनिष्क ज्वेलर्ससमोर दुचाकीवर आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून पैसे पळवल्याची तक्रार त्याने जिन्सी पोलिसांकडे दाखल केली होती.
advertisement
‎घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी तातडीने तपासाची चाके फिरवली. सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक गणेश माने तसेच पथकाने तांत्रिक विश्लेषण, घटनास्थळाचा अभ्यास आणि आरोपीची पार्श्वभूमी तपासली. तेव्हा फरदीनवर दीड लाखांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आणि संशयाची सुई त्याच्याच दिशेने वळली. चौकशीत कठोर भूमिका घेताच फरदीनने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
‎पोलीस तपासात उघड झाले की, लुटीचा बनाव रचण्यापूर्वी फरदीनने दोन मित्रांशी संगनमत करून कट आखला होता. ठरल्याप्रमाणे त्याच्याच साथीदारांनी दुचाकीवरून पैसे घेऊन पलायन केले.आरोपीला न्यायालयात हजर केले असता ९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती निरीक्षक बुधवंत यांनी दिली.
‎काही दिवसांपूर्वी उस्मानपुरा परिसरातही अशाच प्रकारे चालकाने लुटीचे नाटक रचले होते. त्या घटनेप्रमाणेच जिन्सी पोलिसांनीही हा गुन्हा झपाट्याने उलगडून दाखवत तपासातील तत्परतेचे पुन्हा एकदा उदाहरण घालून दिले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar : हुंदके देत रडला, निरागस असल्याचा आव आणला, 4 लाख चोरणारा नोकर कुठं फसला?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement