Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वर्दळीचा भुयारी मार्ग 3 दिवस बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून प्रमुख भुयारी मार्ग 3 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्वारगेटमधील केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणाऱ्या भुयारी मार्गावर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
जेधे चौक ते सारसबाग भुयारी मार्ग शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री 11 वाजल्यापासून पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम 10 नोव्हेंबर रोजी सकाळी सातपर्यंत सुरू राहणार असून, तोपर्यंत या मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
advertisement
जेधे चौकातील भुयारी मार्गात पाणीगळती
गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट परिसरातील केशवराव जेधे चौकातील भुयारी मार्गातून काही दिवसांपासून पाणी गळत असून, त्यामुळे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून मार्गाच्या भिंतींमधून होत असलेली गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. पुढील तीन दिवसांत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरू असताना या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
शंकरशेठ रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांना सध्या भुयारी मार्ग टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वाहनांनी डाव्या बाजूच्या मार्गाने जेधे चौकात यावे आणि तेथून सारसबागेकडे वळावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 08, 2025 7:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वर्दळीचा भुयारी मार्ग 3 दिवस बंद, पर्यायी मार्ग कोणते?


