२१ व्या शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण! इतक्या वेळेसाठी पृथ्वी जाणार अंधाराखाली, दिवस कोणता?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Surya Grahan : एक अभूतपूर्व आणि दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठे आणि दीर्घकाळ टिकणारे ग्रहण ठरणार असून, वैज्ञानिक आणि खगोलप्रेमींसाठी ही घटना मोठ्या आकर्षणाचा विषय बनली आहे.
एक अभूतपूर्व आणि दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठे आणि दीर्घकाळ टिकणारे ग्रहण ठरणार असून, वैज्ञानिक आणि खगोलप्रेमींसाठी ही घटना मोठ्या आकर्षणाचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे, हे ग्रहण संपूर्ण ६ मिनिटे आणि २३ सेकंद चालणार असून, इतक्या वेळेसाठी सूर्य पूर्णपणे झाकला जाणे हे अत्यंत दुर्मिळ आहे.
advertisement
advertisement
सूर्यग्रहण घडण्यामागील वैज्ञानिक कारणे - हे विलक्षण ग्रहण एकाच वेळी घडणाऱ्या तीन अपूर्व खगोलीय घटनांचा परिणाम आहे. त्या काळात पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक दूर असेल, त्यामुळे सूर्याचा आकार आकाशात तुलनेने लहान दिसेल. या वेळी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येईल, ज्यामुळे तो मोठा आणि अधिक स्पष्ट दिसेल. चंद्राची सावली पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळून जाईल, त्यामुळे तिचा वेग कमी होईल आणि ग्रहणाचा कालावधी वाढेल. या तिन्ही घटकांच्या एकत्र येण्यामुळे हे ग्रहण इतके लांब आणि नेत्रदीपक ठरणार आहे.
advertisement
advertisement
कोणत्या भागात किती काळ अंधार राहील? - दक्षिण स्पेनमधील अनेक शहरांमध्ये सुमारे चार मिनिटे अंधार पसरलेला राहील. मोरोक्कोतील टँजियर आणि टेटुआन या शहरांमध्ये थेट सावलीचा प्रभाव जाणवेल, तर लिबियातील बेनगाझीजवळ अंधार जवळपास पाच मिनिटे टिकेल. सर्वाधिक प्रभाव इजिप्तच्या ऐतिहासिक लक्सर शहराजवळ दिसेल, जिथे सूर्यग्रहणाचा अंधार तब्बल सहा मिनिटांहून अधिक काळ टिकेल.
advertisement
हे ग्रहण कधी असणार? - इतक्या दीर्घ कालावधीचे सूर्यग्रहण पुन्हा एकदा पाहायला मिळण्यासाठी मानवजातीला जवळपास एक शतक प्रतीक्षा करावी लागेल.हे ग्रहण २ ऑगस्ट २०२७ दिसणार आहे. हा दिवस खगोलशास्त्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. त्या दिवशी लाखो लोकांना आकाशात सूर्याचा लोप आणि निसर्गाने रंगवलेला अंधाराचा चमत्कार पाहण्याची संधी लाभणार आहे.


