हळदीचं पाणी की हळदीचं दूध, शरीरासाठी कोणतं अधिक फायदेशीर? अनेकांना 'या' गोष्टी माहितच नाहीत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हळदीत असलेला कर्क्युमिन हा घटक तिला तो तेजस्वी पिवळा रंग देतो आणि तिचे आरोग्यदायी गुण वाढवतो.
मुंबई : भारतीय स्वयंपाकघरात हळदीचं स्थान अगदी खास आहे. केवळ अन्नाला सुंदर पिवळा रंग देण्यासाठीच नाही, तर ही एक शक्तिशाली नैसर्गिक औषधी म्हणूनही ओळखली जाते. शतकानुशतके हळद ही आपल्या स्वयंपाकाचा आणि आयुर्वेदिक उपचारांचा एक अविभाज्य भाग राहिली आहे. हळदीत असलेला कर्क्युमिन हा घटक तिला तो तेजस्वी पिवळा रंग देतो आणि तिचे आरोग्यदायी गुण वाढवतो.
कर्क्युमिनमध्ये सूज कमी करणारे, अँटिऑक्सिडंट आणि जखम बरी करणारे गुण असतात. त्यामुळे ती शरीराला संसर्गांपासून वाचवते, पचन सुधारते, सांध्यातील वेदना कमी करते आणि एकूणच शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
आजच्या काळात हळदचा वापर अनेक प्रकारे केला जातो. पण सर्वाधिक लोकप्रिय दोन पद्धती म्हणजे हळदीचं पाणी आणि हळदचं दूध पिणं. दोन्ही तयार करायला सोपी आहेत, मात्र शरीरावर होणारा परिणाम थोडासा वेगळा असतो. चला तर पाहूया, कोणता प्रकार तुमच्यासाठी योग्य आहे.
advertisement
हळदचं पाणी
हलकी गरम पाण्यात थोडीशी हळद मिसळून हे पाणी तयार केलं जातं. अनेकजण त्यात चिमूटभर मिरी, मध किंवा लिंबूरसही घालतात, ज्यामुळे त्याचे फायदे आणखी वाढतात.
फायदे:
हळदचं पाणी सकाळी प्यायचं एक उत्तम मॉर्निंग ड्रिंक आहे. हे शरीराला हायड्रेट करतं, डिटॉक्स करण्यात मदत करतं आणि लिव्हरची कार्यक्षमता सुधारतं. पचन सुधारतं, पित्तस्राव (bile) वाढवतं आणि पोटफुगी कमी करतं. यात कॅलरी कमी असल्याने वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठीही हे उत्तम पर्याय आहे.
advertisement
हळदीतील कर्क्युमिन पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही, त्यामुळे शरीर त्याचे सर्व फायदे शोषून घेऊ शकत नाही. म्हणून हलक्याशा सूजेसाठी उपयोगी असलं तरी खोलवरच्या वेदनांमध्ये याचा प्रभाव कमी असतो.
कधी प्यायचं?
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास हलकं गरम हळदीचं पाणी सर्वाधिक फायदेशीर ठरतं.
हळदचं दूध
भारतीय घरांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी हळदचं दूध पिण्याची परंपरा आहे. दूधात हळद घालून ते गरम केलं जातं. काहीजण त्यात मिरी, आले किंवा दालचिनीही घालतात.
advertisement
फायदे:
हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि सर्दी, खोकला किंवा संसर्गांपासून संरक्षण करतं. दूधातील फॅटमुळे हळदतील कर्क्युमिन शरीरात अधिक परिणामकारकपणे शोषलं जातं, ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होते. गरम दूध शरीराला आराम देतं, तर हळद मन शांत ठेवते, त्यामुळे झोपेचं गुणवत्ताही सुधारते. तसेच हे प्रथिने, कॅल्शियम आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध पेय आहे.
मर्यादा:
यात कॅलरी हळदच्या पाण्यापेक्षा जास्त असतात. लॅक्टोज इन्टॉलरंट लोकांसाठी हे योग्य नाही, मात्र ते प्लांट-बेस्ड मिल्क (उदा. बदाम, सोया दूध) वापरू शकतात.
advertisement
कधी प्यायचं?
रात्री झोपण्यापूर्वी गरम हळदीचं दूध पिणं सर्वाधिक फायदेशीर ठरतं.
आता हळदीचं पाणी vs हळदचं दूध कोणतं अधिक फायदेशीर? हा महत्वाचा प्रश्न उपस्थीत होतो.
दोन्हींचा उद्देश वेगळा आहे पण एकमेकांना पूरक आहेत. हळदचं पाणी शरीराला रिफ्रेश करतं, डिटॉक्स करतं आणि मेटाबॉलिझम सुधारतं. तर हळदचं दूध शरीराला रिलॅक्स, मजबूत आणि आतून आरोग्यवान बनवतं. योग्य वेळी योग्य प्रकारे घेतल्यास हळद तुमच्या दैनंदिन जीवनशैलीचा एक आरोग्यदायी आणि नैसर्गिक भाग बनू शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 7:31 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हळदीचं पाणी की हळदीचं दूध, शरीरासाठी कोणतं अधिक फायदेशीर? अनेकांना 'या' गोष्टी माहितच नाहीत


