आजचं हवामान: सकाळी थंडी, दुपारी उन्ह, मुंबईत हवापालट, शनिवारी कोकणात काय स्थिती?

Last Updated:
Weather Alert: मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पावसाचा जोर ओसरला असून आता थंडी जाणवू लागली आहे.
1/5
.राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून पावसाचा जोर दिसत होता, पण आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर हा पाऊस हळूहळू ओसरत चालला आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरात आकाश कोरडे होत चालले असून हवेत आता हलका गारवा जाणवू लागला आहे. वातावरणात ओलावा कमी झाल्याने सकाळी गारठा आणि दुपारी ऊन अशी हवा तयार झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस या भागात असाच कोरडा आणि थंड गारवा असलेली स्थिती राहील.
राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून पावसाचा जोर दिसत होता, पण आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर हा पाऊस हळूहळू ओसरत चालला आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरात आकाश कोरडे होत चालले असून हवेत आता हलका गारवा जाणवू लागला आहे. वातावरणात ओलावा कमी झाल्याने सकाळी गारठा आणि दुपारी ऊन अशी हवा तयार झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस या भागात असाच कोरडा आणि थंड गारवा असलेली स्थिती राहील.
advertisement
2/5
मुंबईत आज सकाळपासून हवेत गारवा जाणवतो आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने आकाश स्वच्छ असून कोरडं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी तापमान अंदाजे 24 ते 25 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं असून दुपारच्या सुमारास ते 30 ते 31अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी थंड वाऱ्याची झुळूक जाणवेल, पण दुपारी ऊन तापेल. सायंकाळी पुन्हा हलका गारवा जाणवेल. गुलाबी थंडीची सुरुवात होत असल्याने मुंबईकर आता थंडीच्या स्वागतासाठी तयार होत आहेत.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही हवामान कोरडे झाले आहे. पावसाची शक्यता नाही आणि वातावरणात गारवा वाढू लागला आहे. सकाळी येथे तापमान अंदाजे 20 ते 22 अंश सेल्सिअस इतके राहिले, तर दुपारी सूर्यप्रकाशामुळे ते 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. सकाळी थोडी थंडी जाणवते, पण दुपारी उन्हाची तीव्रता वाढते. या भागात हलकी धुंदी आणि कोरड्या हवेमुळे गुलाबी थंडीची चाहूल स्पष्ट दिसत आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून या भागांत पाऊस सतत होत होता, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला होता. आता तो पाऊस थांबल्याची चिन्हे दिसू लागली आहेत आणि थंड हवेचा स्पर्श खाल्ल्यामुळे ग्रामीण भागात थंडीची सुरुवात झाली आहे. सध्या दिवसभरात तापमान साधारण 23-27°C च्या दरम्यान आहे, रात्री व पहाटे हवे थंडीचा अनुभव देत आहे . साधारण 22-24°C पर्यंत कमी होईल असं दिसत आहे.

5/5
आठ नोव्हेंबर 2025 रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने आता विश्रांती घेतली असून वातावरणात थोडी थंडी जाणवू लागली आहे. सकाळच्या वेळी गारवा, दुपारी हलकं ऊन आणि संध्याकाळी पुन्हा थंडावा असा बदलता माहोल राहील. त्यामुळे आता या भागांमध्ये ऊन, पाऊस आणि थंडी अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement