Sankashti Chaturthi: बाप्पा पावताे! संकष्टीच्या रात्री केलेले हे अचूक उपाय नोकरी-व्यवसायासाठी शुभ

Last Updated:

Sankashti Chaturthi Upay: श्री गणेशाची पूजा बुद्धी, ज्ञान, सिद्धी आणि विघ्न दूर करणारा दाता म्हणून केली जाते. गणरायाच्या कृपेनेच बुद्धीची वाढ होते आणि व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होते. म्हणूनच, आजच्या संकष्टी व्रताच्या रात्री...

News18
News18
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केली जाते. संकष्टीचा उपवास आणि गणेशाची पूजा याचे समीकरण गणेश भक्तांमध्ये दृढ झालं आहे. श्री गणेशाची पूजा बुद्धी, ज्ञान, सिद्धी आणि विघ्न दूर करणारा दाता म्हणून केली जाते. गणरायाच्या कृपेनेच बुद्धीची वाढ होते आणि व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होते. म्हणूनच, आजच्या संकष्टी व्रताच्या रात्री काही प्रभावी उपाय केले तर करिअरशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. आज, 8 नोव्हेंबर 2025 रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत साजरं केलं जात आहे. या दिवशी चंद्रदर्शन करताना म्हणजेत रात्री कोणते उपाय करता येतील, त्याविषयी जाणून घेऊ.
संकष्टीच्या करावे हे उपाय -
चंद्राला जल अर्पण करा - चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला जल अर्पण करा आणि नंतर त्याच पाण्यात थोडी हळद आणि अखंड तांदळाचे दाणे मिसळा. खालील मंत्राचा जप करत रहा. यामुळे मनाला शांती मिळेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासाठीचा मंत्र आहे: "ओम श्री गणेशाय नम:" किंवा "गण गणपतये नम:."
advertisement
मंत्राचा जप करणे - रात्री पूजा करताना, श्री गणेशासमोर बसून मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे व्यवसायात यश मिळू शकते आणि नोकरीशी संबंधित कामे पूर्ण होऊ शकतात. यासाठीचा मंत्र आहे:
"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभा."
संकटनाशन गणेश स्तोत्र - चंद्रोदयाच्या वेळी श्री गणेशाच्या मूर्तीसमोर बसा आणि "संकटनाशन गणेश स्तोत्र" पठण करा. या विधीने गणराया प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील. मानसिक ताण कमी होईल, व्यवसायाशी संबंधित कामातही भरभराट होईल.
advertisement
मोदक आणि दुर्वा अर्पण करा - रात्री चंद्राचे दर्शन घेण्यापूर्वी लाडक्या गणरायासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. गणेशाला 21 जुडी दुर्वा अर्पण करा, मोदक किंवा तीळाचे लाडू अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना, तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करा. यानं तुमच्या नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि तुमचे पद वाढेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Sankashti Chaturthi: बाप्पा पावताे! संकष्टीच्या रात्री केलेले हे अचूक उपाय नोकरी-व्यवसायासाठी शुभ
Next Article
advertisement
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement