मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 8 ते दुपारी 1.30 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर खोळंबा
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4.40 या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत बंद राहील. तसेच सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकसेवा देखील 10.48 ते 4.43 या वेळेत बंद असेल. पनवेल ते सीएसएमटी मार्गावरील लोकल सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत आणि गोरेगाव/वांद्रे येथून सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत बंद राहतील.
दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चावलण्यात येणार आहेत.
कांजूरमार्गला मध्यरात्री पॉवर ब्लॉक
कांजूरमार्ग येथील स्थानकावरचा कल्याणच्या दिशेचा पादचारी पूल हटवण्यासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12 ते रविवारी पहाटे 5 दरम्यान अप व डाउन धिम्या आणि जलद मार्गावर, तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रात्रीच्या वेळी विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.
ब्लॉक काळात रात्री 11.40 वाजता असणारी ठाणे ते कुर्ला, पहाटे 4.04 वाजताची ठाणे – सीएसएमटी आणि रात्री 11.38 आणि 12.24 वाजताची सीएसएमटी – ठाणे लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.