प्रवाशांसाठी मोठा दिलासा
नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्याने कर्जत आणि पनवेलमधील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच कमी होणार नाही तर मुंबईच्या उपनगरातील वाहतुकीवरील ताण देखील काही प्रमाणात कमी होईल.
Mumbai Metro: दक्षिण मुंबईकरांसाठी खूशखबर! मार्चमध्येच धावणार भुयारी मेट्रो, तिकीट दर काय?
बोगदे आणि पूल बांधकामाचा टप्पा पूर्ण
advertisement
हा मार्ग डोंगराळ प्रदेशातून जात असल्याने यासाठी वावरले, नधाळ आणि किरवली येथे तीन बोगदे तयार करण्यात आले आहेत. तिन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय 47 पुलांपैकी 29 छोटे आणि 6 मोठे पूल पूर्ण झाले आहेत.
नवीन दुहेरी मार्गिकेचा फायदा
यापूर्वी या मार्गावर फक्त मालगाड्या आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या धावत होत्या. मात्र, नवीन दुहेरी मार्गिकेमुळे लोकल गाड्या थेट कर्जत-पनवेल मार्गे धावू शकतील, त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल.
महत्त्वाची स्थानके
या मार्गावर पनवेल, मोहोपे आणि कर्जत अशी तीन महत्त्वाची स्थानके असतील. दोन जुन्या स्थानकांना नव्या मार्गिकेशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीत मोठा बदल होईल आणि स्थानिक तसेच प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.