नेमकं काय आहे प्रकरण
मूळची मुंबईच्या मानखुर्द इथे रहिवासी असलेल्या १६ वर्षांच्या युवतीचा 28 वर्षीय मामावर जीव जडला. लग्न करण्यासाठी शनिवारी घर सोडून वसईतील गावराई पाडा येथे मामाकडे राहण्यास आली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आईने लगेच पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करुन घेतला. मामा हा वसईतील एका कंपनीत कामाला होता. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, भाची जेव्हा लग्नाचा तगादा लावू लागली, तेव्हा त्याने कंटाळून एक कट आखला.
advertisement
भाईंदरहून नालासोपाऱ्याला जाण्यासाठी मामा भाची सोबत लोकलने निघाले. नायगाव-भाईंदरदरम्यान लोकल सुसाट धावत असताना, तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी जे पाहिले, त्याने सगळ्यांचा थरकाप उडाला. मामाने प्रेम करणाऱ्या भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले. यात लोकलमधून पडून तिचा जागीच मृत्यू झाला.
16 वर्षांच्या युवतीनं ज्या मामासाठी घर सोडलं, प्रेम केलं जीव लावला, तिलाच मामाने कायमचं संपवलं. प्रवाशांनी या नराधम मामाला लागलीच पकडले आणि त्याला वसई रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. या धक्कादायक घटनेने मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासली. आरोपी मामाला कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
