Skin Care Tips : हिवाळ्यात देखील सनस्क्रीन वापरावी का? कोणते होतात फायदे? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

अनेकांचा समज असतो की, सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरायची. पण, तसं नाही. आपल्या त्वचेला नेहमी सनस्क्रीनची गरज असते. अगदी पावसाळा आणि हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन वापरणे महत्वाचे आहे. 

+
Skin

Skin care Tips 

अमरावती : उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढतो. त्यामुळे अनेकजण सनस्क्रीन वापरतात. अनेकांचा समज असतो की, सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरायची. पण, तसं नाही. आपल्या त्वचेला नेहमी सनस्क्रीनची गरज असते. अगदी पावसाळा आणि हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे. वर्षभर सनस्क्रीन वापरल्यास काय फायदे होतात? याबाबत माहिती डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
वर्षभर सनस्क्रीन वापरावी का?
वर्षभर सनस्क्रीन वापरल्यास काय फायदे होतात? याबाबत माहिती देताना डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, अनेक लोकांना गैरसमज आहे की, सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरायची. पण, माझ्या मते जेव्हा जेव्हा सूर्यकिरण पडेल तेव्हा सनस्क्रीन वापरायला पाहिजे. वर्षभर सुद्धा सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, तुमच्या त्वचेवर डाग आहेत, वांग आहेत तर तुम्हाला अगदी पावसाळ्यात देखील सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.
advertisement
हिवाळ्यात सनस्क्रीन कशी वापरावी?
हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते. तर आता मॉइश्चरायझर बेस सनस्क्रीन देखील आहेत. ते लावून सुद्धा तुमची त्वचा कोरडी वाटत असेल तर तुम्ही आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून त्यावर सनस्क्रीन लावू शकता. पण, बाराही महिने सनस्क्रीन लावणे तुम्ही विसरता कामा नये.
advertisement
सनस्क्रीन वापरल्यास कोणते फायदे होतात?
पुढे त्या सांगतात की, सनस्क्रीन त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देते. त्वचेचे अकाली वृद्धत्व थांबवते. रिंकल्स, पिगमेंटेशन, फाईन लाईन्स कमी होतात. तसेच टॅनिंग कमी करते. सूर्यामुळे त्वचा काळी पडणे कमी होते. त्वचेवरील डाग-छटे कमी होण्यासाठी मदत होते. स्किन कॅन्सरपासून देखील संरक्षण देते, अशी माहिती डॉ. अनुराधा यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care Tips : हिवाळ्यात देखील सनस्क्रीन वापरावी का? कोणते होतात फायदे? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement