Bluetooth Interesting Facts : लोगोचा रंग निळा पण दातांशी काय संबंध? ब्लूटूथच्या नावाची इंटरेस्टिंग स्टोरी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bluetooth Name Story : आपल्यापैकी बरेच जण ब्लूटूथ वापरतात. ब्लूटूथ वाचताच ब्लू म्हणजे निळा रंग आणि टूथ म्हणजे दात समोर येतात. ब्लूटूथ ज्याचा रंग निळा नाही ना त्याचे दात. मग निळा रंग आणि दाताशी याचा संबंध काय? ब्लूटूथ हे नाव कसं पडलं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
ब्लूटूथचा शब्दशः अर्थ ब्लू टूथ असा होतो, ज्याबद्दल आपण अनेकदा विनोद करतो. पण ना याचा रंग ब्लू म्हणजे मिळा ना त्याचे टूथ म्हणजे दात. मग याचा निळा रंग आणि दातांशी संबंध काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ब्लूटूथ हे नाव प्रत्यक्षात ब्लू टूथवरून ठेवण्यात आलं होतं.
advertisement
advertisement
दहाव्या शतकात डेन्मार्क आणि नॉर्वेमध्ये एक राजा होता ज्याचं नाव हॅराल्ड. त्याचा एक दात मृत होता, ज्यामुळे तो निळा दिसत होता. डेन्मार्क आणि नॉव्रे यांना एकत्र आणणारा हॅराल्ड, लोकांना जोडण्याचं, एकत्र आणण्याचं काम त्याने केलं. डॅनिश जमातींना एका राज्यात एकत्र केलं. हॅरॉडल्डप्रमाणेच अनेक उपकरणांना जोडणारं माध्यम म्हणून त्याच्या टोपणनावावरून ब्लूटूथ हे नाव पडलं.
advertisement


