डोक्यावर पातेलं ठेऊन बनवला चहा, मलायकाचं टॅलेंट पाहून जजही बेशुद्ध, पाहा VIDEO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
India's Got Talent Malaika Arora : 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने आपल्या कृतीने सर्वांना हैरान केलं आहे.
Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा काही दिवसांपूर्वी यो यो हनी सिंहच्या 'चिलगम' या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत होती. तर काहींनी तिला नृत्यामुळे चांगलच ट्रोल केलं. मलायका आता 'इंडियाज गॉट टॅलेंट'मुळे चर्चेत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाचं अभिनेत्री परीक्षण करत आहे. तिच्यासोबत नवजोत सिंह सिद्धूदेखील परीक्षक म्हणून आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मलायकाने चक्क एका स्पर्धकाच्या डोक्यावर ठेववेल्या गॅसवर चहा बनवला. त्यानंतर तिने हा चहा सिद्धूसह उपस्थित काहींना प्यायला दिला. मलायका आणि त्या स्पर्धकाच्या धाडसाने सर्वांनाच हैरान केलं आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या आगामी एपिसोडमध्ये मलायका आपल्या कृत्याने चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
'चहा'बनवण्यासाठी मलायकाची करामत
'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक त्यांचे कौशल्य दाखवत आहेत. ज्यामुळे सगळेच थक्क होत आहेत. या कार्यक्रमातील एका स्पर्धकाने आपल्या डोक्यावर एका ग्लासवर गॅस ठेवला होता. अशातच मलायकाने हा प्रकार आणखी मजेदार केला. मलायकाने चक्क या स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवलेल्या गॅसवर पातेलं ठेवलं आणि त्यात चहा बनवला.
advertisement
चहा पिऊन बेशुद्ध पडलो तर तुम्ही जबाबदार : नवजोत सिंह सिद्धू
मलायकाने चहा बनवल्यानंतर तो नवजोत सिंह सिद्धू यांना प्यायला दिला. त्यावेळी सिद्धू म्हणाले की,"मी जर चहा पिऊन बेशुद्ध पडलो, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल". यावेळी मलायका म्हणाली,"नाव आहे मलायका तर चहासोबत थोडी मलाई टाकून मी देते". 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दुसरीकडे चाहत्यांना मलायका आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील बॉन्डिंग आणि त्यांची मस्ती खूप आवडत आहे.
advertisement
'इंडियाज गॉट टॅलेंट'चा प्रवास 4 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झाला. हा कार्यक्रम टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. या बहुचर्चित कार्यक्रमात मलायक अरोरा, नवजोत सिंह सिद्धू आणि गायक शान परीक्षक म्हणून काम करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 11:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
डोक्यावर पातेलं ठेऊन बनवला चहा, मलायकाचं टॅलेंट पाहून जजही बेशुद्ध, पाहा VIDEO


