Weather alert: आजवर जे झालं नाही ते आता घडलं! नोव्हेंबरमध्येच जळगावला हुडहुडी, थंडीच्या तीव्र लाटेचा अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जळगावमध्ये नोव्हेंबरमध्ये तापमान ७.१ अंश सेल्सिअसवर गेले, २३ वर्षांचा विक्रम मोडला. हवामान विभागानुसार थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्यातच थंडीने अक्षरशः कहर केला आहे. शहराच्या तापमानाने २३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत थेट ७.१ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी नोंद केली आहे. या भीषण गारठ्यामुळे नागरिकांनी शेकोट्या आणि गरम कपड्यांची मदत घेतली आहे.
साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात जळगाव जिल्ह्याचे रात्रीचे सरासरी तापमान १४ ते १५ अंश सेल्सियसच्या आसपास असते. मात्र, यावर्षी थंडीची लाट अत्यंत तीव्र असून, पारा ९ ते १० अंशांवर घसरला आहे. म्हणजे सरासरी तापमानात तब्बल ४ अंशांनी मोठी घट झाली आहे.
२३ वर्षांचा विक्रम मोडीत
आज नोंदवलेल्या ७.१ अंश सेल्सिअस तापमानामुळे २००२ मध्ये नोंदवलेला ७.४ अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाचा जुना विक्रम मोडीत निघाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तापमान सातत्याने खाली जात असल्यामुळे जिल्ह्याचे वातावरण पूर्णपणे गारठून गेले आहे.
advertisement
पहाटेच्या वेळी तर शहरात धुक्याची दाट चादर पसरल्यामुळे एक मनमोहक, पण तितकेच गारठलेले वातावरण तयार झाले होते. या तीव्र थंडीमुळे रब्बी पिकांना काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता असली तरी, मानवी जीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
थंडीचा जोर अजून वाढणार
view commentsसध्या जिल्ह्यात सुरू असलेली ही तीव्र थंडीची लाट पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर महिन्यातच इतकी थंडी पडत असल्याने, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Location :
Jalgaon,Ratnagiri,Maharashtra
First Published :
November 19, 2025 10:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather alert: आजवर जे झालं नाही ते आता घडलं! नोव्हेंबरमध्येच जळगावला हुडहुडी, थंडीच्या तीव्र लाटेचा अलर्ट


