Astrology: 2026 वर्षाच्या सुरुवातीला आदित्य-मंगल राजयोग! जानेवारीतच 4 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sun Mars Conjunction: नवीन वर्ष 2026 ची आता सर्वांना आतुरता लागली आहे. नवीन वर्ष कोणासाठी कसं असेल, या वर्षांत मनातील कोणत्या इच्छा पूर्ण होतील, नशिबाची साथ कशी असेल, आर्थिक गोष्टी कशा असतील यासह अनेक गोष्टींची उत्सुकता नवीन वर्षाशीसंबंधित आपल्याला असतात. विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच ज्योतिषशास्त्रानुसार एक खास योग जुळत आहे. सूर्य आणि मंगळ यांची शनिच्या राशीत म्हणजे मकर राशीमध्ये युती झाल्यामुळे आदित्य-मंगल योग निर्माण होईल, हा योग अत्यंत शुभ मानला जातोय.
ज्योतिषशास्त्रानुसार, दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी, ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत संक्रमण करेल. या दिवशी अर्थातच मकर संक्रांत साजरी केली जाईल. त्यानंतर दोनच दिवसात म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी ग्रहांचा अधिपती मंगळ ग्रह मकर राशीत संक्रमण करेल. दोन ग्रहांची मकर राशीत युती झाल्याचा राशीचक्रावर परिणाम दिसेल.
advertisement
advertisement
मेष - मेष राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे. साडेसातीचा त्रास सहन करत असतानाच आदित्य-मंगल राजयोग निर्माण झाल्यानं त्यांना काहीसा दिलासा मिळे. कामं चांगल्या पद्धतीनं हातावेगळी करू शकाल, तुमच्या व्यवसायात तेजी येईल, आर्थिक बळ वाढेल आणि कामातील आत्मविश्वासही वाढेल, या सर्वाचा परिणाम आर्थिक गोष्टींवर दिसेल.
advertisement
advertisement
advertisement
मकर - सगळा खेळ मकर राशीतच होत असल्यानं मकर राशीच्या लोकांना आदित्य-मंगल राजयोग भाग्याचा ठरेल. यामुळे तुम्हाला मोठे फायदे होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय देखील सुरू करू शकता. अचानक आर्थिक लाभ होईल. अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता जास्त आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


