पंढरपुरातील अहिल्या पूलावर भीषण अपघात, ट्रॅक्टर अन् कंटेनर नदीत कोसळला, दोघांचा जागीच मृत्यू

Last Updated:

सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर रविवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात झाला.

News18
News18
वीरेंद्रसिंह उत्पाट, प्रतिनिधी पंढरपूर: सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर रविवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर आणि कंटेनरचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहने थेट पुलावरून नदीपात्रात कोसळली. या दुर्दैवी दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुलांसह आठ जण गंभीर जखमी झाले.

अपघाताचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ऊसतोड कामगारांची एक टोळी कर्नाटकातून आपले काम संपवून ट्रॅक्टरने आपल्या मूळ गावी परतत होती. रात्री साडेआठच्या सुमारास हा ट्रॅक्टर चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर आला असता, समोरून येणाऱ्या कंटेनरशी त्याची धडक झाली. यावेळी दोन्ही वाहनांचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहने थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.
advertisement
ट्रॅक्टरमध्ये एकूण नऊ लोक प्रवास करत होते, तर कंटेनरमध्ये दोन लोक होते. हे सर्वजण वाहनांसह पुलाखाली कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या अंधारात हा अपघात झाल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले.
या भीषण अपघातात महादेव दिलीप काळे (वय ५०) आणि राजू रमेश चव्हाण (वय ४०) या दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ८ आणि ४ वर्षांच्या दोन लहान मुलांचा देखील समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
लक्ष्मण राजेंद्र चव्हाण (३८), सुवर्णा ज्ञानेश्वर पवार (४५), अनिता भारत काळे (१९), विनोद सुखदेव गोमटे (३०), नाना हनुमंत काळे (३२), देवांगी राजेंद्र चव्हाण (८), गुड्डन राजेंद्र चव्हाण (४) आणि ब्रिजेश कुमार (३५) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत.

गावकऱ्यांवर शोककळा

हे सर्व मजूर करकंब गावातील रहिवासी होते. पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकला गेलेली ही टोळी घरापासून काही अंतरावरच होती. अशात त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातामुळे करकंब गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंढरपुरातील अहिल्या पूलावर भीषण अपघात, ट्रॅक्टर अन् कंटेनर नदीत कोसळला, दोघांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement