धर्मेंद्रची हिरोईन, दिलीप कुमारसोबत अफेअरच्या चर्चा; असं काय घडलं ज्यामुळे थाटला बहिणीच्या नवऱ्यासोबत संसार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेते धर्मेंद्र यांच्या पहिल्या सिनेमातील त्यांची हिरोईन, जिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षात गेलं. तिचं लग्न बहिणीच्या नवऱ्याशी लावून देण्यात आलं.
पडद्यावर दिसणाऱ्या अभिनेत्री आणि त्यांचं खरं आयुष्यात खूप मोठी तफावत असते. सिनेमात काम करताना त्या नेहमीच त्यांचं वैयक्तिक आयुष्य दूर ठेवत आल्या आहेत. अशीच एक अभिनेत्री जिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. धर्मेंद्र यांच्या पहिल्या सिनेमाची ती हिरोईन होती. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात इतकी मोठी उलथापालथ झाली की तिचं लग्न तिच्या बहिणीच्या नवऱ्याशी करण्यात आलं.
advertisement
1940, 1950 आणि 1960 च्या दशाकात या अभिनेत्रीनं अशोक कुमार, राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार, राज कुमार, धर्मेंद्र आणि इतर अनेक भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकारांसोबत काम केलं. या अभिनेत्रीला भारतातील सर्वात वयस्कर अभिनेत्री मानले जात होतं. जवळपास सात दशकांहून अधिक काळ तिने भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली.
advertisement
आपण दिग्गज अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत त्या आहेत कामिनी कौशल. त्यांचं 14 नोव्हेंबर रोजी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं. त्या इंडस्ट्रीतल्या सर्वात वयस्कर अभिनेत्री होत्या. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी प्रशंसयिन काम केलं. पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या कामिनी कौशल यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेलं होतं.
advertisement
कामिनी कौशल यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1927 रोजी लाहोर येथे झाला. त्याचं खरं नाव उमा कश्यप होतं. त्या सात वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब हालाकिच्या परिस्थिती जगलं. कामिनी कौशल यांना मोठी बहिण होती. त्यांच्या बहिणीचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. तिला दोन मुलं होती. बहिणीच्या मृत्यूनंतर 1948 साली कामिनी कौशल यांचं लग्न बहिणीच्या नवऱ्याशी म्हणजेच बी.एस. सूदशी लावण्यात आलं.
advertisement
लग्नानंतर कामिनी कौशल मुंबईत आल्या. त्यानंतर त्यांनी त्याच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. 'दो भाई', 'शहीद', 'नदीया के पार', 'जिद्दी', 'शबनम', 'पारस', 'नमूना', 'आरझू', 'झंजर', 'आबरू', 'बडे सरकार' आणि 'जेलर' यासारख्या चित्रपटांसह तिने तिच्या काळातील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून आपलं स्थान निर्माण केलं.
advertisement
कामिनी कौशल या अभिनेते धर्मेंद्र यांच्या पहिल्या सिनेमाची हिरोईन होत्या. त्यानंतर दोघांनी 'आदमी और इन्सान', 'याकीन' आणि 'खुदा कसम' यासारख्या सिनेमांत एकत्र काम केलं. दरम्यान त्यांचं नाव अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी जोडलं होतं. कामिनी या दिलीप कुमार यांची पहिली मैत्रीण होत्या. दोघांनी शहीद सिनेमात एकत्र काम केलं होतं.
advertisement


