Numerology: मनात असतं, पण दाखवत अजिबात नाहीत! या तीन जन्मतारखा असणाऱ्यांचा अंदाज लावणं कठीण
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: अंकशास्त्रात मूलांकावरून व्यक्तीची सगळी कुंडली काढता येऊ शकते. जन्मतारखेवरून मूलांक संख्या मिळते आणि मूलांक तुमच्या स्वभावाचा जणू आरसाच असतो. मूंलांकावरून व्यक्तिच्या जीवनातील अनेक गोष्टींवर त्यानं तोंडानं न सांगताही प्रकाश टाकता येतो. एखादा माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हे ओळखण्यासाठी अंकशास्त्राचा चांगला वापर करता येऊ शकतो.
काही लोकांचा स्वभाव फारच गूढ असतो, त्यांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज करणं अवघड असतं. काही मुलींचे मन ओळखणे तर कधी-कधी खूप कठीण असतं, त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेणं तितकं सोपं काम नसतंय. तुमच्या संपर्कात असं कोणी असल्यास त्याची-तिची जन्मतारीख माहिती करून घ्या, त्यावरून मनात आणि तोंडात काय आहे, हे ओळखता येऊ शकतं.
advertisement
आज आपण मूलांक 7 विषयी जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 7 असतो. या मूलांकाच्या मुली मनातलं न कळू देणाऱ्या असतात. त्या काय विचार करत आहेत, हे समोरच्या बिलकूल कळू शकणार नाही. या मूलांकावर केतू ग्रहाचा प्रभाव असतो, तो रहस्य, आध्यात्मिक ऊर्जा, अंतर्ज्ञान आणि गूढ विचार यांचे प्रतीक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कमी मित्र असतात, पण अत्यंत निष्ठावान -या मुली लगेच सर्वांशी मिसळत नाहीत, परंतु जेव्हा चांगल्या मित्र बनतात तेव्हा पूर्ण प्रामाणिकपणे नातं सांभाळतात. त्या नातेसंबंधांमध्ये अत्यंत निष्ठावान असतात आणि त्यांच्या प्रियजनांसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 मुली मनाने अत्यंत संवेदनशील असतात. गरजूंना मदत करण्यास नेहमीच तयार असतात.


