आता दारात नाही तर थेट घरात शिरलाय... बिबट्या पाहून उडाली झोप, थरारक VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नागपूरच्या भांडेवाडीमध्ये जखमी बिबट्या घरात शिरला, वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल. दौंड आणि शिरूर परिसरातही बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
नागपूर शहराच्या भांडेवाडी परिसरात आज सकाळी मोठी खळबळ उडाली. एक बिबट्या थेट नागरिकाच्या घरात शिरल्याची घटना समोर आली. सकाळीच ही घटना घडल्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भांडेवाडी भागातील एका फ्लॅट स्कीममधील घरात हा बिबट्या शिरल्याचे कळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, घरात शिरलेला हा बिबट्या जखमी अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घरात बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वन विभाग आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या वनविभागाचे पथक बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्याचे आणि त्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न करत आहे. घरात बिबट्या शिरल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
advertisement
दौंड तालुक्यातील पारगावच्या एका शेतकऱ्याच्या पडीक शेतीमध्ये पाल ठोकणाऱ्या खोर मधील मेंढपाळाच्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केला. रात्रीच्या अंधारात केलेल्या हल्ल्यामध्ये ५० हजार रुपये किंमतीचा लाल रंगाचा घोडा जागीच मृत्युमुखी पडला. मेंढ्यांच्या मुक्कामासाठी शेतात पाल ठोकले होते. रात्रीच्या सुमारास आबा पिसे कुटुंबीयासह पालामध्ये झोपले असताना बिबट्याने बांधलेल्या घोड्यावरती हल्ला केला. बिबट्याने घोड्याच्या मानेचा चावा घेतल्याने घोडा जागेत मृत पावला. त्यानंतर पोटाच्या मागील भाग खाऊन फस्त केला.
advertisement
शिरूर तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरात नरेश्वर मंदिराजवळ मादी बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांचा असा तीन बिबट्यांच्या कळप मुक्तपणे फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सणसवाडी परिसरातील बिबट्यांच्या या मुक्त संचाराचा व्हिडीओ एका वाहनचालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. या भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्येही घबराट पसरली आहे.
view commentsLocation :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
November 19, 2025 11:46 AM IST


