Eknath Shinde BJP : सगळ्यांचे लक्ष कल्याण-डोंबिवलीत, पण दुसऱ्याच ठिकाणी भाजपकडून गेम, चक्रव्यूहात अडकला शिंदेंचा मंत्री

Last Updated:

Eknath Shinde vs BJP : कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेत शिंदे गटाची भाजपकडून होत असलेली कोंडी हे कारण असल्याची चर्चा सुरू होती. सगळ्यांचे लक्ष ठाणे, कल्याण-डोंबिवलीत लागलं असताना भाजपने दुसऱ्याच ठिकाणी गेम केला आहे.

सगळ्यांचे लक्ष कल्याण-डोंबिवलीत, पण दुसऱ्याच ठिकाणी भाजपने गेम केला, चक्रव्यूहात अडकला शिंदेंचा मंत्री
सगळ्यांचे लक्ष कल्याण-डोंबिवलीत, पण दुसऱ्याच ठिकाणी भाजपने गेम केला, चक्रव्यूहात अडकला शिंदेंचा मंत्री
मुंबई: महायुतीमधील धुसफूस मंगळवारी चव्हाट्यावर आली. कॅबिनेट बैठकीवर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेत शिंदे गटाची भाजपकडून होत असलेली कोंडी हे कारण असल्याची चर्चा सुरू होती. सगळ्यांचे लक्ष ठाणे, कल्याण-डोंबिवलीत लागल असताना भाजपने दुसऱ्याच ठिकाणी गेम केला आहे. भाजपच्या खेळी शिंदे गटाचा मंत्री अडचणीत आला आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत महायुतीमधील वाद, कुरघोडी, डाव-प्रतिडाव दिसू लागले आहेत. भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून विरोधकांसह आपल्याच मित्रपक्षांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

शिंदेंच्या मंत्र्यांला घेरलं...

नगर परिषद निवडणुकांची चाहूल लागताच नाशिकमध्ये भाजपने आक्रमक मोहीम सुरू केली आहे. मित्रपक्षांशी युती तोडल्यावर आता भाजपने थेट शिवसेनेचे एकमेव जिल्हा मंत्री दादा भुसे यांच्यावरच राजकीय डाव टाकला आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदापासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या भुसेंच्या कट्टर विरोधकांना भाजपमध्ये घेत गिरीश महाजन यांनी भुसेविरोधी राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या हालचालींमुळे भुसे चक्रव्यूहात अडकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
advertisement

राष्ट्रवादी अजित पवारांच्या शिलेदाराची कोंडी...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्रपक्षांना बाजूला सारत भाजपने स्वतंत्रपणे कूच केली आहे. यात पहिला फटका राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला बसला. सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काका हेमंत वाजे यांना भाजपमध्ये घेऊन राष्ट्रवादीचे मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारालाच महाजन यांनी थेट आव्हान दिलं. हा निर्णय भाजपच्या व्यापक रणनीतीचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे.
advertisement

शिंदेंच्या विश्वासू नेत्याला घेरलं...

यानंतर दुसरी मोठी चाल मालेगावमध्ये खेळली गेली. माजी आमदार अपूर्व हिरे आणि प्रसाद हिरे यांना भाजपमध्ये सामील करून घेतल्यानंतर आता भुसेंचे कट्टर विरोधक अद्वया हिरे यांनाही पक्षात दाखल करण्यात आलं. पुढील आठवड्यात भुसेविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे बंडुकाका बच्छाव यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित असल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
या सलग घडामोडींमुळे दादा भुसे यांच्या भोवतीचा ‘राजकीय चक्रव्यूह’ अधिक घट्ट होत चालला आहे. भाजपने विरोधकांना आपल्या गोटात खेचत भुसेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू केल्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. आगामी निवडणुकीत भुसे हा चक्रव्यूह कसा भेदतात, हे नाशिकच्या राजकारणात सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde BJP : सगळ्यांचे लक्ष कल्याण-डोंबिवलीत, पण दुसऱ्याच ठिकाणी भाजपकडून गेम, चक्रव्यूहात अडकला शिंदेंचा मंत्री
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement