मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले मेट्रो स्टेशनहून सुटलेली गाडी दुपारी सांताक्रूझकडे जात होती. अचानक गाडीत स्पार्क झाला. या घटनेमुळे काही काळासाठी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र गाडी थांबवून तातडीने सर्व प्रवाशांना सांताक्रूझ स्टेशनवर उतरवण्यात आले.
यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या मेट्रोमध्ये रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठा अपघात घडला नाही. या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा केला आहे.
advertisement
तथापि, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड किंवा वायरिंगमध्ये झालेल्या बिघाडामुळे स्पार्क झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणाची चौकशी तांत्रिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, प्रवाशांनीही प्रशासनाकडून दिलासा व्यक्त केला आहे. गाडीत काही क्षणांसाठी निर्माण झालेल्या भीतीमुळे काही जण घाबरले असले तरी कर्मचारी वर्गाने दाखवलेल्या तत्परतचे कौतुक होत आहे.