मेट्रो प्रवाशांसाठी कधी सुरू होणार?
धारावी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रो मार्ग वित्तीय वर्ष 2024-25 च्या अखेरपर्यंत (मार्च 2025 पर्यंत) प्रवाशांसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. हा टप्पा सुरू झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन होऊ शकते.
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर! मिठी नदीखालून धावली मेट्रो, कधी सुरू होणार प्रवास?
advertisement
6 प्रमुख स्थानके
या मेट्रो मार्गावर 6 प्रमुख स्थानके असणार आहेत. यामध्ये धारावी, शितला देवी मंदिर, दादर मेट्रो, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांचा समावेश असणार आहे.
मेट्रो तिकिटाचे दर
मुंबई मेट्रो लाइन 3 साठी तिकिट दर किमान 10 रुपये आणि कमाल 50 रुपये असा असेल.
आरे – बीकेसी मेट्रो मार्गाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) 32.5 किमी लांबीच्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो 3 चे बांधकाम करत आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा 12.69 किमी लांबीचा टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये सेवेत दाखल झाला. मात्र, या मेट्रोला अपेक्षेप्रमाणे प्रवासी मिळत नाहीत. सुरुवातीला रोज 4 लाख प्रवासी या मेट्रो मार्गावर प्रवास करतील असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात फक्त 20 हजार प्रवासीच या मेट्रोचा वापर करत आहेत. त्यामुळे मेट्रो 3 मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढवणे हे MMRC साठी मोठे आव्हान ठरत आहे.
दरम्यान, मुंबई मेट्रो 3 मार्गिका पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल.