TRENDING:

चार मेट्रो मार्गिकेंसाठी एकच तिकीट, ‘One Ticket’ App मधून बुक करा अन् कुठेही फिरा...

Last Updated:

Mumbai Metro Ticket : चारही मेट्रोंमध्ये कायमच प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एकाच तिकिटावरून चारही मेट्रो मार्गिकांमधून प्रवास करता येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईकरांसाठी मेट्रो म्हणजे एक जीवनवाहिनी ठरली आहे. वाहतुक कोंडीमधून सुटण्याचा एक उत्तम पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रोचे जाळे मुंबईसह उपनगरांमध्ये पसरत आहे. नेहमीच मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये एकूण चार मेट्रो आहेत. मेट्रो- 1, मेट्रो 2- अ, मेट्रो- 3, मेट्रो- 7 असे मुंबईमध्ये चार मेट्रो मार्ग आहेत. या चारही मेट्रोंमध्ये कायमच प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एकाच तिकिटावरून चारही मेट्रो मार्गिकांमधून प्रवास करता येणार आहे.
Metro: कनेक्टिव्हिटी सुधारणार! कल्याणमध्ये मेट्रो धावणार, मेट्रो लाईन-5बाबत मोठी अपडेट
Metro: कनेक्टिव्हिटी सुधारणार! कल्याणमध्ये मेट्रो धावणार, मेट्रो लाईन-5बाबत मोठी अपडेट
advertisement

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचं कमबॅक, 21 जिल्ह्यांना अलर्ट

'घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा' या मार्गावरील 'मेट्रो- 1' चे संचलन करणाऱ्या 'मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड' (एमएमओपीएल) ने ‘वन तिकीट’ ॲप कार्यान्वित केले आहे. जर प्रवाशांना एकावेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक मार्गिकांवरून प्रवास करायचा असेल तर त्या प्रवाशांना या ॲपवरून एकच तिकीट खरेदी करता येणार आहे. येत्या काळात आणखी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्या मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी ॲपवर तिकीट उपलब्ध होणार आहे. सध्या तरी या ॲपवर घाटकोपर- अंधेरी मेट्रो-1, दहिसर- अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, दहिसर- गुंदवली मेट्रो ७ आणि आरे- आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक भुयारी मेट्रो ४ या चार मेट्रो मार्गिका सेवेत दाखल आहेत.

advertisement

नवरात्राची चौथी माळ : सुख आणि मिळेल समृद्धी, अशी करा कूष्मांडा देवीची उपासना

दरवर्षी किमान ५० किमीच्या मेट्रो मार्गिका या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांच्या वाहतूक सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले आहे. त्यामुळे सध्या वाहतूक सेवेत असलेले ७० किमीचे मेट्रोचे जाळे येत्या काही वर्षातच २७० किमी आणि पुढे ३३७ किमीवर पोहचणार आहे. प्रत्येक मेट्रो मार्गिका एकमेकीच्या नजीकच असल्याचे पाहायला मिळते. ती प्रत्येक मेट्रो मार्गिका दुसऱ्या मेट्रो मार्गिकेसोबत जोडली जाणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये प्रवाशांच्या प्रवासी वेळेत आणखी बचत होणार आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेचा वापर करून लवकरात लवकर पोहोचता येईल.

advertisement

IBPS मध्ये मेगाभरती, पदवीधर करू शकतात अर्ज; अर्जाची शेवटची तारीख आली जवळ

‘वन तिकीट’ ॲप कार्यान्वित करण्याचे प्रमुख उद्दिष्ट प्रवाशांची सोय आणि वेळेची बचत आहे. शिवाय, प्रवाशांना तिकीट सोप्या पद्धतीने उपलब्ध होणे सुद्धा आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएमओसीएलने स्वीक्वेलस्ट्रिंग कंपनी आणि एमएमओसीएलने वनतिकिट ॲप कार्यान्वित केले आहे. ओएनडीसी (Open Network For Digital Commerce) हे नेटवर्कवर ॲप जून २०२५ मध्ये कार्यान्वित करण्यात आले होते. मेट्रो ३ चे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो ३ साठी हा ॲप कार्यान्वित केला आहे. या ॲपला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एमएमओसीएलने ॲपची सुधारित आवृत्ती आता कार्यान्वित केली आहे. प्रवाशांसाठी हा ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
चार मेट्रो मार्गिकेंसाठी एकच तिकीट, ‘One Ticket’ App मधून बुक करा अन् कुठेही फिरा...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल