बंधुराया आपल्या बहिणीकडे भाऊबीजेसाठी जात असतो.पण मुंबईसारख्या ठिकाणी प्रवास करणे म्हणजेच खूपच अवघड असते.कारण ट्रेन आणि खाजगी वाहतुकीत वेळेवर पोहोचण्याची पंचाईत होतं.अशात बंधुरायासाठी बेस्ट धावून आली आहे.बंधुरायाला आपल्या बहिणीकडे पोहोण्यासाठी बेस्टने 134 अतिरीक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे बंधुरायाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत भाऊबीज सणाला प्रत्येक जण घराबाहेर पडत असतो. त्यामुळे ट्रेन आणि वाहतुक सेवेत प्रवास करताना खूप अडचण होते. ही अडचण पाहता आता भाऊबीज सणाच्या निमित्ताने वाढत्या प्रवासी मागणीच्या अपेक्षेने,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि बेस्टने 23 ऑक्टोबर रोजी मुंबई आणि लगतच्या भागात 134 अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
कुठे धावणार बसेस
या अतिरिक्त बसेस मुंबई शहर, त्याच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये तसेच ठाणे, मीरा रोड आणि भाईंदर सारख्या विस्तारित प्रदेशांमध्ये सेवा देतील. ठाण्यात, मॅरेथॉन चौक, कोपरी, कॅडबरी जंक्शन आणि दादलानी पार्क हे प्रमुख पिक-अप पॉइंट्स असतील", असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नवी मुंबईत, कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली गाव आणि सीबीडी बेलापूर यासारख्या प्रमुख ठिकाणी वाढीव सेवा उपलब्ध असतील, ज्याचा उद्देश उत्सवाच्या काळात कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि प्रवाशांचा प्रवास सुलभ करणे आहे.
"प्रवाशांच्या अपेक्षेनुसार वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी, बेस्ट प्रमुख बस थांबे आणि रेल्वे स्टेशन डेपोवर वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी देखील तैनात करेल" असे अधिकाऱ्याने सांगितले.या उपक्रमाने प्रवाशांना विस्तारित सेवांचा लाभ घेण्याचे आणि उत्सवादरम्यान सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.