TRENDING:

मुंबईचा कायापालट करणारा MMRDA चा मोठा प्रकल्प; रस्ते वाहतुकीला देणार नवं वळण!

Last Updated:

मुंबईतील सर्व रहिवाशांना फायदा होईल, असं अधिक सुव्यवस्थित आणि सुलभ वाहतूक नेटवर्क तयार करणं हे एमएमआरडीएचं उद्दिष्ट आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 25 सप्टेंबर : मुंबईमध्ये लवकरच एका कायापालट करणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामध्ये पहिला शहरी भूमिगत बोगदा (Underground Road Tunnel) तयार केला जाणार आहे. हा दूरदर्शी प्रकल्प शहरातील रस्ते वाहतुकीला नवीन वळण देण्यासाठी तयार केला आहे.
News18
News18
advertisement

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या उपक्रमाचं नेतृत्व करत आहे. हा प्रकल्प फक्त काँक्रिट आणि सामान्य बोगद्यांपेक्षा जास्त मानला जात आहे. कारण, यामुळे ते मुंबईतील लोकांचं जीवन सुसह्य होणार आहे.

या प्रकल्पाचं ईस्टर्न फ्रीवेवरील ऑरेंज गेटला निसर्गरम्य मरिन ड्राइव्ह किनारपट्टी मार्गाशी जोडण्याचं उद्दिष्ट आहे. 9.23 किलोमीटर कॉरिडॉर असलेला हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. येथील वाहतूक कोंडी ही एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. शिवाय, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी) जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे (एमटीएचएल) ती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे.

advertisement

या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रोची (L&T) कंत्राटदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या कंपनीचं कौशल्य हेच या दूरदर्शी प्रकल्पाची प्रेरक शक्ती आहे.

Mumbai Redevelopment : मुंबईकरांसाठी गणपतीत मोठं गिफ्ट! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई भूमिगत रस्ता बोगदा प्रकल्पाचे तपशील

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या केंद्रस्थानी 6.51-किलोमीटर ट्विन-ट्यूब भूमिगत बोगद्याचा समावेश आहे. प्रत्येक बोगद्यात दोन-दोन (उजव्या बाजूने दोन आणि डाव्या बाजूने दोन) वाहतूक मार्ग, एक-एक आपत्कालीन मार्ग आणि पादचारी मार्ग आहेत. त्यांच्या भूमिकांनुसार, 4.5 किलोमीटर पसरलेला डाव्या बाजूचा बोगदा दक्षिणेकडील वाहतुकीसाठी आहे, तर दोन किलोमीटरचा विस्तार असलेला उजव्या बाजूचा बोगदा उत्तरेकडील रहदारीची पूर्तता करेल. हा अभियांत्रिकी चमत्कार सध्याच्या पायाभूत सुविधांच्या खालून नेव्हिगेट करेल. या सुविधांमध्ये ज्यात रेल्वे, भूमिगत मेट्रो, रस्ते आणि हेरिटेज स्ट्रक्चर्स समाविष्ट आहेत. त्यामुळे जमिनीच्या खाली 40 मीटर खोलीवर हा नवीन भूयारी मार्ग तयार होईल.

advertisement

मुंबई भूमिगत रस्ता बोगदा प्रकल्प: मंजुरी आणि परवानग्या

या क्रांतीकारी प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्यासाठी, कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) मंजुरी, भू-संपादन आणि वाहतूक ब्लॉक व्यवस्थापनासह अनेक महत्त्वपूर्ण परवानग्या आणि मंजुरी आवश्यक आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 7 हजार 765 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

मुंबई भूमिगत रस्ता बोगदा प्रकल्पाचे इतर तपशील

advertisement

या प्रकल्पामध्ये ईस्टर्न फ्री वे ऑरेंज गेट येथे एक व्हायाडक्ट तयार करण्याचं काम देखील समाविष्ट आहे. ज्यामुळे वाहनांना सहज या मार्गावर प्रवेश मिळेल. या व्यतिरिक्त, कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना खुले कट आणि प्रवेश रस्ते तयार केले जातील. प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमपासून फार दूर नसलेल्या बीडी सोमाणी चौकानंतर समुद्रमार्गाच्या खालून एक बोगदा जाईल. प्रकल्पाच्या संरेखनामध्ये कट-अँड-कव्हर रोड्स आणि व्हायाडक्ट्सचं बांधकाम समाविष्ट आहे. ज्यासाठी आधुनिक बोअरिंग मशीनचा वापर करून बोगदा काढला जाईल.

advertisement

मुंबई भूमिगत रस्ता बोगदा प्रकल्प: मुंबईतील लोकांचा काय फायदा?

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल, मरिन ड्राईव्ह आणि ईस्टर्न फ्री वेला अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. सरदार वल्लभभाई पटेल रोडवरील कायमची वाहतूक कोंडी कमी होईल कारण काही वाहतूक बोगद्यात वळवली जाईल. बोगदा कार्यान्वित झाल्यानंतर, ईस्टर्न फ्री वे ते मरिन ड्राईव्हपर्यंतच्या गर्दीच्या वेळेत सध्या 30 मिनिटे लागणाऱ्या प्रवासाला फक्त 10 मिनिटं लागतील.

शिवाय, हा बोगदा पर्यावरणपूरक, कार्बन उत्सर्जन कमी करणारा आणि मुंबईच्या पश्चिम व पूर्वेकडील भागांना एकत्र करण्याच्या उद्देशानं भविष्यातील कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना पाठबळ देणारा असेल. दक्षिण मुंबईतील रहिवासी नवी मुंबई आणि त्या पलीकडे जलद कनेक्शनची अपेक्षा करू शकतात. एकूणच प्रवासातील सुलभता वाढेल.

मुंबईतील सर्व रहिवाशांना फायदा होईल, असं अधिक सुव्यवस्थित आणि सुलभ वाहतूक नेटवर्क तयार करणं हे एमएमआरडीएचं उद्दिष्ट आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईचा कायापालट करणारा MMRDA चा मोठा प्रकल्प; रस्ते वाहतुकीला देणार नवं वळण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल