Mumbai Redevelopment : मुंबईकरांसाठी गणपतीत मोठं गिफ्ट! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mumbai Redevelopment : मुंबईसह महानगर प्रदेशातील रखडलेल्या पुर्नविकासाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
मुंबई, 21 सप्टेंबर (उदय जाधव, प्रतिनिधी) : मुंबईकरांसाठी चांगली बातमी आली आहे. मुंबईसह महानगर प्रदेशातील रखडलेल्या पुर्नविकासाचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना BMC, TMC, MMRDA व Cidco, Mhada व अन्य प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त अन्य इच्छुक प्राधिकरण/संस्था प्रस्तुत योजनेत सहभागी होऊ शकतील, असंही निर्णयात म्हटलं आहे.
मुंबईच्या विकासाला गती मिळणार
- मुंबई महानगर प्रदेशातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी विकासात असमर्थ ठरल्यास अशा रखडलेल्या योजनासुद्धा संयुक्त भागीदारीरित्या राबवण्यात येतील.
- रखडलेल्या योजनांबाबत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (स.नि. व.पु.) अधिनियम,1971 च्या कलम 13(2) अन्वेय विकासक बदलण्याची कार्यवाही संबंधित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत करण्यात येईल.
- पुनर्वसन प्रकल्पाकरिता संबंधित महामंडळ/प्राधिकरण/स्थानिक नागरी स्वराज्य संस्था आणि संबंधित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यामध्ये द्विपक्षीय करारनामा होणे आवश्यक राहील
- सदरहू संयुक्त भागीदारी तत्वावरील झोपडपट्टी पुनर्विकास योजनांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हेच नियोजन प्राधिकरण असेल
- पुर्नविकास दरम्यान येणारा खर्चाबाबत "सर्वांकरता परवडणारी घरे" या योजनेंतर्गत घरे बांधून त्याची खुल्या बाजारात विक्री करून बांधकामाचा व योजनेकरीता लागणारा इतर खर्च भागवला जाणार
- झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये जुन्या विकासामार्फत केलेल्या बांधकामाचे मुल्यांकन करुन येणारी रक्कम संबंधित विकासकास अदा करणे, संयुक्त भागीदारी रित्या योजना राबवर्णा-या प्राधिकरणास स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेस बंधनकारक राहील.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2023 10:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Redevelopment : मुंबईकरांसाठी गणपतीत मोठं गिफ्ट! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय