TRENDING:

होळी, धुलिवंदनला जरा जपून! मुंबई पोलिसांची आपल्यावर नजर, ही चूक कराल, तर थेट तुरुंगात जाल!

Last Updated:

Mumbai Police Advisory For Holi: होळी आणि धुलिवंदननिमित्त मुंबई पोलिसांनी एक नियमावली जाहीर केली आहे. हे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई – होळी आणि धुलिवंदन सण शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी काही कडक नियम लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन, बीभत्स गाणी वाजवणे, पादचाऱ्यांवर रंग फेकणे, फुगे फेकणे, मद्यधुंद होऊन गोंधळ घालणे यावर कडक बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 च्या कलम 135 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुंबई पोलिसांकडून होळी आणि धुलिवंदनसाठी कडक नियमावली, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई पोलिसांकडून होळी आणि धुलिवंदनसाठी कडक नियमावली, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
advertisement

या गोष्टींवर बंदी

1) अश्लील गाणी आणि घोषणांवर बंदी: सार्वजनिक ठिकाणी अश्लील किंवा बीभत्स गाणी वाजवल्यास पोलीस कारवाई करतील.अश्लील वर्तन आणि इशाऱ्यांवर कारवाई: महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या किंवा अनैतिक गोष्टींचा प्रचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

2) फुगे फेकण्यावर पूर्ण बंदी: पादचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा रंगांनी भरलेले फुगे फेकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम कठोर: मद्यपान करून वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष कारवाई होणार आहे.

advertisement

3)मद्यपान करून गोंधळ घालणे किंवा वाहन चालवणे यावर बंदी असणार आहे.

मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या, रस्त्यावर गाड्या अडवणाऱ्या किंवा इतरांना त्रास देणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत. दारू पिऊन गाडी चालवणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे किंवा एका दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे यावरही विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

4) आक्षेपार्ह चित्रे, फलक किंवा चिन्हांवर बंदीजातीय किंवा धार्मिक भावना दुखावणारे पोस्टर, चित्रे किंवा पुतळे सार्वजनिक ठिकाणी लावण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच, कोणत्याही समाजाला किंवा व्यक्तीला लक्ष्य करणारे मजकूर असलेल्या फलकांवरही बंदी असेल.

advertisement

होळी साजरी करताना घ्या काळजी! ती चूक पडेल महागात, थेट 5 वर्षांचा तुरुंगवास

10,000 हून अधिक पोलीस तैनात

मुंबईत होळी व धुलिवंदन सण शांततेत पार पाडण्यासाठी  10,000 हून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये 7 अपर पोलीस आयुक्त, 19 पोलीस उपायुक्त, 51 सहायक पोलीस आयुक्त, 1767 पोलीस अधिकारी आणि 9145 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय एस.आर.पी.एफ., आरसीपी प्लाटून, क्युआरटी पथक, बीडीडीएस पथक आणि गृहरक्षक दलही तैनात राहणार आहे.

advertisement

वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

गुरुवार रात्रीपासून वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाणार असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन

मुंबई पोलिसांनी नागरिकांना शांततेत आणि सुरक्षिततेत होळी व धुलिवंदन साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कुठल्याही बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
होळी, धुलिवंदनला जरा जपून! मुंबई पोलिसांची आपल्यावर नजर, ही चूक कराल, तर थेट तुरुंगात जाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल