होळी साजरी करताना घ्या काळजी! ती चूक पडेल महागात, थेट 5 वर्षांचा तुरुंगवास
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Holi 2025: होळी साजरी करताना मुंबईकरांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा थेट कारवाई करण्यात येणार असून 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो.
नवी मुंबई: होळी आणि धुलिवंदनचा सण संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईत देखील या सणाला एक वेगळा उत्साह असतो. परंतु, होळी साजरी करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा रासयनिक रंग व फुगे फेकण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हे दाख होणार आहेत. तसेच थेट कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.
5 वर्षांची कैद
होळी आणि धुलिवंदनला ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षांची कैद, 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पुन्हा तसेच उल्लंघन सुरू ठेवल्यास दिवसाला 5 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कायद्याच्या कलम 15 (1) नुसार शिक्षा झाल्यापासून 1 वर्षाच्या काळात अशा प्रकारचा गुन्हा केल्यास 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नवी मुंबई महापालिकेने दिला आहे. या काळात महानगरपालिकेची पथके गैरप्रकार करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत.
advertisement
20 मार्चपर्यंत मनाई आदेश
होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी रासायनिक रंगाचा वापर करू नये. पादचाऱ्यांवर फुगे फेकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने 20 मार्चपर्यंत ठाणे जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 13, 2025 9:03 AM IST