अडीच ते तीन तासांत सामान्य परिस्थितीत होणारा हा प्रवास सुट्टीच्या दिवसांत, मुसळधार पाऊसांत किंवा अपघात घडल्यास खंडाळा घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. अशा वेळी वाहन चालकांना तासन्तास रस्त्यावर ताटकळत पडावे लागते आणि प्रवासाचा वेळ वाढतच जातो. या कायमस्वरूपी अडचणीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने एक्सप्रेसवेला एक नवा, अत्यंत वेगवान आणि आधुनिक महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अटल सेतू ते पुण्याजवळील शिवरे जंक्शनपर्यंत नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसवे असणार आहे. याची एकूण लांबी सुमारे 130 किलोमीटर पर्यंत असणार आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, महत्त्वाकांक्षी नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसवेसाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नवीन मार्ग जेएनपीए परिसरातील अटल सेतूच्या जवळून सुरू होऊन थेट पुणे जिल्ह्यातील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पगोटे (जेएनपीएजवळ) ते पनवेलच्या चौकदरम्यानच्या मार्गाला आधीच प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गाच्या उभारणीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या एक्सप्रेसवे मुळे प्रवासाचा फार वेळ वाचणार आहे.
सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी प्रवाशांना एक्सप्रेसवेवर स्वतंत्र लेन, कमी वळणांचे डिझाइन, मजबूत पूल शिवाय आवश्यक ठिकाणी बोगदे बांधले जाणार आहेत. त्यामुळे घाटातील धोकादायक वळणं, अपघाताची शक्यता आणि नेहमीची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या 90 मिनिटांत पार करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांना या महामार्गाचा फायदा फक्त राज्यातील प्रवाशासाठीच नाही तर, इतर राज्यातही प्रवाशांना सहज प्रवास करता येणं शक्य होणार आहे.
गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे- मुंबई- बेंगळुरू हा लांब पल्ल्याचा प्रवास साधारण साडेपाच तासांत शक्य होईल. प्रकल्पामुळे उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः आयटी, ऑटोमोबाईल उद्योग, बंदराशी निगडित व्यवसाय आणि निर्यातदारांसाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असून, राज्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल.
