Health Tips : पायाच्या अंगठ्यामध्ये तीव्र वेदना? दुर्लक्ष करू नका; असू शकतं गंभीर कारण, Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सध्या बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे अनेकांमध्ये युरिक ॲसिड वाढण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
अमरावती : सध्या बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे अनेकांमध्ये युरिक ॲसिड वाढण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सुरुवातीला किरकोळ वेदना जाणवत असल्या तरी पुढे ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. युरिक ॲसिड वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात? काय काळजी घ्यावी पाहुयात.
युरिक ॲसिड म्हणजे काय?
शरीरात अन्न पचताना तयार होणाऱ्या प्युरिन घटकांपासून युरिक ॲसिड तयार होते. सामान्य परिस्थितीत हे ॲसिड लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. मात्र त्याचे प्रमाण वाढल्यास ते सांध्यांमध्ये साचते आणि वेदना निर्माण होतात.
युरिक ॲसिड वाढल्यावर कोणती लक्षणे दिसतात?
पायाच्या अंगठ्यामध्ये तीव्र वेदना होते. गुडघे, टाच, बोटे यांना सूज येते. चालताना त्रास होतो. सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटतात. किडनी स्टोनचा धोका वाढतो.
advertisement
डॉक्टर काय सांगतात?
याबाबत तज्ज्ञ सांगतात की, युरिक ॲसिड वाढणे ही आजकाल सामान्य समस्या होत आहे. अनेक रुग्ण वेदना वाढल्यानंतरच डॉक्टरांकडे येतात. मात्र सुरुवातीच्या टप्प्यातच रक्ततपासणी करून उपचार सुरू केल्यास हा त्रास सहज नियंत्रणात ठेवता येतो. योग्य आहार, पाणी आणि व्यायाम याकडे दुर्लक्ष केल्यास सांध्यांवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.
युरिक ॲसिड वाढीची प्रमुख कारणे कोणती?
जास्त मांसाहार करणे. दारू आणि बिअरचे सेवन करणे. तेलकट आणि जंक फूड खाणे. पाणी कमी पिणे. वजन वाढणे, मधुमेह आणि रक्तदाब ही कारणे असू शकतात.
advertisement
नियंत्रणासाठी काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, रोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्यावे. हिरव्या भाज्या, फळे, दूध, ताक यांचा आहारात समावेश करावा. मांसाहार टाळावा. नियमित चालणे, योग किंवा हलका व्यायाम करावा. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत. स्वतःहून औषधे घेणे टाळावे. युरिक ॲसिड वाढणे ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. वेळीच तपासणी व योग्य उपचार केल्यास सांधेदुखी, गाऊट आणि किडनी स्टोनसारखे गंभीर आजार टाळता येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : पायाच्या अंगठ्यामध्ये तीव्र वेदना? दुर्लक्ष करू नका; असू शकतं गंभीर कारण, Video







